Meet IPS Officer Abhay Chudasama : आयपीएस अधिकारी बनणे हे अनेकांचे स्वप्न असते. आयपीएस अधिकारी होण्यासाठी लाखो यूपीएससी इच्छुक नागरी सेवा परीक्षेला बसतात. मात्र, त्यापैकी काहींनाच अंतिम यादीत स्थान मिळू शकते. अनेक वर्षे नागरी सेवक म्हणून काम केल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी जीवनातील इतर गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्या प्रतिष्ठित नोकरीचा राजीनामा दिला. तर आज आपण अशाच एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या नोकरीचा म्हणजेच अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) पदाचा राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठ महिन्यांपूर्वीच दिला राजीनामा

गुजरातचे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून नावलौकिक मिळविलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव अभय चुडासामा (Abhay Chudasama) असे आहे. निवृत्तीच्या आठ महिन्यांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. आयपीएस अधिकारी अभय यांनी राजीनामा दिला आहे; पण गुजरात सरकारने तो अद्याप स्वीकारलेला नाही, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. ५९ वर्षीय अभय यांना गेल्या वर्षी अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) पदावर बढती मिळाली होती. सध्या ते कराई, गांधीनगर येथील गुजरात पोलीस अकादमीचे प्राचार्य म्हणून तैनात आहेत. राज्याच्या गृह खात्याने चुडासामा यांच्या स्वेच्छानिवृत्तीबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरेही दिलेली नाहीत.

अभय चुडासामा (अभय चुडासामा) हे १९९९ मध्ये गुजरात पोलिसांत राज्य पोलिस सेवा अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर २००४ मध्ये त्यांना आयपीएस म्हणून पदोन्नती मिळाली. २०२३ मध्ये कराई येथे बदली होण्यापूर्वी त्यांनी गांधीनगर रेंजचे महानिरीक्षक म्हणून काम केले.

हे १९९९ मध्ये गुजरात पोलिसांत राज्य पोलिस सेवा अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर २००४ मध्ये त्यांना आयपीएस म्हणून पदोन्नती मिळाली. २०२३ मध्ये कराई येथे बदली होण्यापूर्वी त्यांनी गांधीनगर रेंजचे महानिरीक्षक म्हणून काम केले.

१९९९ च्या बॅचचे अभय चुडासामा हे अधिकारी यापूर्वी सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील आरोपी होते. त्यांना २०१० मध्ये अटक करण्यात आली होती. नंतर विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले. उच्च न्यायालयाने त्यांना एप्रिल २०१४ मध्ये जामीन मंजूर केला आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना पुन्हा कामावर सुद्धा घेण्यात आले.