एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल ६ हजारांहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या मेगाभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर या भरतीसाठी पात्र उमेदवार १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. ही भरती ६ हजारांहून अधिक जागांसाठी होत असल्याने नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी कोण अर्ज करु शकतं आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ते जाणून घेऊया.

एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत ६ हजार ३२९ पदांसाठी भरती –

पदाचे नाव रिक्त पदे
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक५,६६०
हॉस्टेल वॉर्डनपुरुष३३५
हॉस्टेल वॉर्डनमहिला३३४

हेही वाचा- मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! CCRAS अंतर्गत ‘वरिष्ठ संशोधन फेलो’ पदासाठी भरती सुरु, ३५ हजारांपर्यंत पगार मिळणार

शैक्षणिक पात्रता –

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – संबंधित विषयात पदवी + B.Ed + CTET.

हॉस्टेल वॉर्डन –

पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – २१ ते ३५ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज फी –

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्ष पदासाठी खुला आणि ओबीसी प्रवर्गासाठी १५०० रुपये.
  • हॉस्टेल वॉर्डन पदासाठी खुला आणि ओबीसी प्रवर्गासाठी १००० रुपये.
  • मागासवर्गीय/ PwD यांना दोन्ही पदासाठी अर्ज फी आकारली जाणार नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १९ जुलै २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईट – https://tribal.nic.in/

भरती संबंधिक अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1wPClPqfoec–N-TwCngjNOKTqOFjpZVG/view) या लिंवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader