विवेक वेलणकर

सध्या देशभरातील सरकारी अथवा खासगी शैक्षणिक संस्थामधील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा टप्पा हा पार करावाच लागतो. प्रत्येक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांची पात्रता, अभ्यास, तारखा या वेगवेगळ्या असतात. त्याबद्दलची माहिती या सदरात दर पंधरा दिवसांनी…

Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल
supreme Court
Supreme Court : वयाच्या १४ वर्षी केलेल्या गुन्ह्यात व्यक्तीची २९ वर्षांनंतर सुटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात

स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेतील सर्व स्तरांवर कायदेशीर सुरक्षिततेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. विधिज्ञ अर्थात वकील सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. देशात आजघडीला विविध न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले दाखल आहेत आणि दररोज हजारो खटले नव्याने दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर वकिलांची गरज सातत्याने वाढत आहे. विधी शिक्षण पदवीधरांना म्हणजेच वकिलांना वित्तसंस्था, संरक्षणदले, सरकारी व निमसरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, विधी महाविद्यालयात अध्यापन, वकिली व्यवसाय, पत्रकारिता, लीगल प्रोसेस आऊटसोर्सिंग अशा अनेक क्षेत्रांत संधी आहे. कायदा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे काही गुण असणे आवश्यक आहे. जसे उत्कृष्ट मसुदा लेखन, सादरीकरण व संवाद कौशल्य, चातुर्य, आत्मविश्वास व उत्तम आकलन क्षमता.

हेही वाचा >>> माझीस्पर्धा परीक्षा : ‘प्लॅन बी’ तयार ठेवा

लॉ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर तीन वर्षांचा किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते. बारावीनंतरच्या लॉ कोर्सच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सीईटी घेतली जाते ज्यातून राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित लॉ कॉलेजेस मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. कोणत्याही बोर्डातून कोणत्याही शाखेतून किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेल्या तसेच यंदा बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध आहे. याशिवाय दहावीनंतर तीन वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल. या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील अनुदानित व विनाअनुदानित लॉ संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.

यासाठी ३ मे २०२४ रोजी राज्यस्तरीय सीईटी परीक्षा होईल. परीक्षा राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये घेतली जाईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून दीडशे मार्कांच्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन तासात दीडशे प्रश्न सोडवावे लागतात. यामध्ये लॉजिकल रीझनिंग ४० प्रश्न, लीगल रीझनिंग ४० प्रश्न, सामान्यज्ञान ३० प्रश्न व इंग्रजी ३० प्रश्न आणि गणित १० प्रश्न असतील. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते आणि चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होत नाहीत.

परीक्षा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांत देता येते. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने cetcell. mahacet. org या संकेतस्थळावर दाखल करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी आहे. या परीक्षेच्या मार्कांवर पुढील प्रवेश प्रक्रियेचे राऊंड होतील.

Story img Loader