MHT CET Results 2024 Passing Percentage Topper List: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने, १६ जून रोजी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित व जीवशास्त्र या विषयांचा MHT CET निकाल २०२४ जाहीर केला आहे. MHT CET निकालात, अधिकाऱ्यांनी टक्केवारीसह टॉपर्सची यादी देखील जाहीर केली आहे. यंदा पीसीएम गटातून २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. तर पीसीबी गटातून १७ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. राज्यातील पीसीबी आणि पीसीएम गटातील मिळून एकूण ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. खुल्या प्रवर्गातील १८ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइलसह प्रथम क्रमांक मिळवला आहे तर ओबीसी प्रवर्गात शंभर पर्सेंटाइलसह आठ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आपल्याला निकालाची प्रत काढायची असल्यास किंवा गुणांची पडताळणी करायची असल्यास Cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन MHT CET 2024 टॉपर्सची यादी तपासू शकतात. MHT CET 2024 टॉपर्सच्या यादीमध्ये विद्यार्थ्याचा रोल नंबर, नाव, लिंग आणि श्रेणी, तसेच निवासाचा जिल्हा आणि एकूण मिळालेले गुण यांसारखे तपशील असतात.
हे ही वाचा<< एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, यंदा किती विद्यार्थी १०० पर्सेंटाइलचे मानकरी?
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७ लाख २५ हजार ५२ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीए) गटासाठी ३ लाख १४ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी नोंदणी केलेल्या ४ लाख १० हजार ३७७ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९५ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.
पीसीएम गटात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीतील टॉप १०
विद्यार्थ्याचे नाव (PCM) | गुण (Percentile) |
हर्षवर्धन नवेंदु गुप्ता | 100 |
पार्थ पद्मभूषण असती | 100 |
प्रणव अरोरा | 100 |
आर्यन दत्तात्रय भुरे | 100 |
प्रतिक्षा पाणिग्रही | 100 |
घाटे अमलेश उमाकांत | 100 |
साकोरकर शरण्य | 100 |
आदित्य सिंग | 100 |
प्रेरणा दिवाण | 100 |
मोक्ष निमेश पटेल | 100 |
पीसीबी गटात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीतील टॉप १०
विद्यार्थ्याचे नाव (PCB) | गुण (Percentile) |
प्रथम विष्णुकांत गुप्ता | 100 |
जोशी मृदुल समीर | 100 |
चोथे श्रावणी कैलास | 100 |
मोहम्मद इस्माईल नाईक | 100 |
झा अभिषेक वीरेंद्र | 100 |
आद्य दुर्गाप्रसाद हरिचंदन | 100 |
रामतीर्थकर प्रतिक गजानन | 100 |
आदित्य डगवार | 100 |
सोहम भीमराव लगड | 100 |
आराध्या महादेवराव सानप | 100 |
लक्षात ठेवा: एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.