MIB Recruitment 2023: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कॉन्टेन्ट आणि पत्रकारितेमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तरुण व्यावसायिकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मंत्रालयाने एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, एकूण ७५ तरुण व्यावसायिकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. ही भरती एक वर्षाच्या कालवधीसाठी करार करुन केली जाणार आहे. हा कालावधी उमेदवारांच्या कामगिरीनुसार, जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो. विहित प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना प्रिंट, टीव्ही, रेडिओ, ऑनलाइन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी कॉन्टेन्ट किंवा ग्राफिक डिझाइन तयार करावे लागेल. या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
एमआयबी भरती २०२३: कुठे आणि कसा करावा अर्ज?
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारा यंग प्रोफशेनल भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. उमेदवार मंत्रायलाच्या अधिकृत वेबसाईट, mib.gov.in वर व्हॅकन्सी सेक्शनमध्ये सक्रिय केलेल्या लिंकवर किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवर एमआयबी भरती २०२३ अधिसूचना डाऊनलोड करु शकतात आणि ऑनलाईन अर्ज भरू शकता.
एमआयबी भरती २०२३ अधिसूचना डाउनलोड करण्याची लिंक – https://mib.gov.in/sites/default/files/Vaccancy%20%20Hiring%20of%20Young%20Profeessionals.pdf
एमआयबी भरती २०२३ अर्जाची लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWWqgJs1fJS19ydBpCXnXpjUIU5cXJBIxCembZHyu9hcTpvQ/viewform
हेही वाचा : एम्सद्वारे नर्सिंग ऑफिसरच्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, ३०५५ पदांसाठी होणार भरती, मिळेल एवढा पगार
एमआयबी भरती २०२३ कोण करु शकतो अर्ज?
एमआयबी यंग प्रोफेशनल भरतीसाठी अर्जं करण्यासाठी पात्र उमेदवार, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही शिक्षण संस्थेमधून वृत्तपत्रविद्या आणि जनसंपादन किंवा माहितीची कला( इंफॉर्मेशन आर्ट्स) किंवा अॅनिमेशन आणि डिझाइनिंग किंवा साहित्य आणि सर्जनशील लेखनात (क्रिएटिव राइंटिंग) कमीत कमी दोन वर्षाची कालावधीसाठी पदवी किंवा पदव्युत्त असावा. उमेदवारांकडे संबधीत कामाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे. उमेदवारांची वयोमर्यादा अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच ८ मे २०२३ला ३२ वर्षांपेक्षा जास्त नसले पाहिजे.