Ministry of Defense recruitment 2024 : संरक्षण मंत्रालय – मुंबई येथे सध्या मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वाहनाचे मेकॅनिक, सफाई कर्मचारी यांसारख्या विविध पदांवर मिळून ७२ जागांवर भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांना खालीलपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करायचा असल्यास तो कसा करावा ते पाहा. त्यासह या पदांसाठी पात्रता निकष जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Ministry of Defense recruitment 2024 : रिक्त पदे

संरक्षण मंत्रालय – मुंबई<br>१. संरक्षण मंत्रालय – मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी [पूर्ण वेळ] या पदासाठी एक जागा उपलब्ध आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएस [MBBS]चे शिक्षण असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ७५,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.
या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तसेच अर्ज करताना त्याबरोबर आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
अर्ज पाठविण्यासाठी खालील पत्ता पाहा-

मेडिकल ऑफिसर-इन- चार्ज, एमआय रूम, मटेरियल ऑर्गनायझेशन (मुंबई), नेव्हल स्टोअर डेपो, घाटकोपर (प.), मुंबई, पिन कोड- ४०००८६.

या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी अशी आहे.

हेही वाचा : Loco Pilot Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!

Ministry of Defense recruitment 2024 – अधिकृत वेबसाईट –
https://www.mod.gov.in/

Ministry of Defense recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1FFzfYWYSXqrQ52I8Cv-oyuZvqFi52J5j/view

संरक्षण मंत्रालय, सामग्री अधीक्षक, मुंबई – रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता

१. आचारी /कुक- ३
२. सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर- ३
३. एमटीएस- २
४. ट्रेड्समन मेट- ८
५. वाहन मेकॅनिक- १
६. सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर- ९
७. सफाई कर्मचारी / क्लीनर- ४
८. लीडिंग फायरमन- १
९. फायरमन- ३०
१०. फायर इंजिन ड्रायव्हर- १०
एकूण ७१ जागांवर भरती

हेही वाचा : KVK Baramati recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्रात ‘दहावी पास’ उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Ministry of Defense recruitment 2024- अधिकृत वेबसाईट –
https://www.mod.gov.in/

Ministry of Defense recruitment 2024- अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1LaZ2GbuaQeMI6zAix79OJukDr2F6B7bN/view

वाहन मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावी उत्तीर्ण शिक्षण असणे आवश्यक आहे. तर, इतर सर्व पदासांठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डामधून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.

Ministry of Defense recruitment 2024 : संरक्षण मंत्रालय, सामग्री अधीक्षक, मुंबई येथील पदांसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?

इच्छुक उमेदवारांनी वरील नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज भरताना त्यासह आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी अशी आहे.
उमेदवारांनी अंतिम तारखेआधी अर्ज भरावा.

Ministry of Defense recruitment 2024 : अर्जासह लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • अधिवास.
  • मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • दहावी किंवा मॅट्रिकची गुणपत्रिका.
  • अनुभवाचे प्रमाणपत्र.
  • सक्षम उमेदवारांकडून जात / श्रेणीचा पुरावा [SC / ST / OBC / PH(PWD) / ESM / EWS] अधिकारी.
  • प्रवेशपत्र.

वरीलपैकी कोणत्याही पदांसंदर्भात उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा वर दिलेली अधिसूचना वाचावी. नोकरीसंदर्भातील अधिसूचनेची लिंक, तसेच संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटची लिंक वर दिलेली आहे.