Ministry of Railway Recruitment 2023: अनेकांना रेल्वेत काम करण्याची इच्छा असते, अनेक तरुण-तरुणी रेल्वे भरतीसाठी जागा कधी निघतात याची वाट बघत असतात. कारण रेल्वेची नोकरी म्हणजे सरकारी आणि सुरक्षित नोकरी मानली जाते. त्यामुळे अनेकांना तिथे काम करण्याची इच्छा असते. अशाच असंख्य इच्छुक उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे रेल्वे मंत्रालय प्रतिनियुक्तीवर असिस्टंट प्रोग्रॅमर पदाच्या १२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रेल्वे मंत्रालयाच्या २०२३ च्या भरतीच्या अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवाराला ४४ हजार ९०० रुपये ते १ लाख ४२ हजार ४०० रुपयांदरम्यान मासिक पगार मिळणार आहे. रेल्वे मंत्रालय भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये पोस्टिंगचे ठिकाण हे नवी दिल्ली असल्याचं सांगण्यात आलं आहे. या भरतीबाबतची माहिती ‘स्टडी कॅफे’ने दिली आहे. भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पाठवण्याचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊया.
पदांची संख्या –
रेल्वे मंत्रालय भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, सहाय्यक प्रोग्रामर पदाच्या एकूण 12 जागांवर भरती करण्यात येणार आहे.
पोस्टिंगचे ठिकाण –
नवी दिल्ली
कार्यकाळ – नियुक्ती सुरुवातीला 3 वर्षांच्या कालावधीसाठी असेल.
वयोमर्यादा –
हेही वाचा- भारतीय संसदेत काम करण्याची सुवर्णसंधी; लोकसभेत ‘या’ पदासांसाठी होणार भरती, आजच अर्ज करा
अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पगार –
मासिक पगार ४४ हजार ९०० रुपये ते १ लाख ४२ हजार ४०० रुपयांपर्यंत असेल.
पात्रता निकष –
केंद्र किंवा राज्य सरकारे किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा विद्यापीठे किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा अर्ध सरकारी किंवा वैधानिक किंवा स्वायत्त संस्थांचे अधिकारी अर्ज करु शकतात.
हेही वाचा- JNU मध्ये होणाऱ्या भरतीच्या अर्जप्रक्रियेत मुदतवाढ; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
१. मुख्य केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी अॅनॉलॉगस पोस्टवर कार्यरत असावा किंवा, पे मॅट्रिक्सच्या (35400-112400) लेव्हल-6 मधील पाच वर्षांच्या सेवेसह किंवा समतुल्य, पेरेंट केडर किंवा विभागात नियमितपणे नियुक्ती झालेली असावी.
२. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स किंवा माहिती तंत्रज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी किंवा, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E किंवा B.Tec पदवी मिळवलेली असावी. (कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग किंवा माहिती तंत्रज्ञान)
असा करा अर्ज –
रेल्वे मंत्रालय भपरी २०२३ च्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेला अर्ज योग्यरित्या भरुन तो अर्ज रेल्वेचे उपसचिव, कक्ष क्रमांक ११०-सी यांना पाठवू शकतात. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजच्या आवृत्तीत नोटीस प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत हा भरलेला अर्ज रेल भवन, रायसीना रोड, नवी दिल्ली-११०००१ या पत्त्यावर पाठवायचा आहे.