आधुनिक शेती म्हणजे वेगळ्या संकल्पना असून यामध्ये प्रामुख्याने शेतीमधील समस्या व त्यावर उपाय शोधणे हा आहे. सध्या एआय क्षेत्र नाविन्यपूर्ण असून यामध्ये २०२२ मध्ये एक अब्ज अमेरिकी डॉलर एवढी उलाढाल होती, ती २०३० पर्यंत सात अब्ज अमेरिकी डॉलर एवढी अपेक्षित आहे. म्हणून यामध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील तरुणांना संधी आहे.

आधुनिक शेती पर्यावरणपूरक करणे म्हणजे अशी शेतीपद्धत ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन हे प्रामुख्याने उत्पादन वाढवण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मागील लेखात (३१ जानेवारी) आपण पाहिले की, वातावरणातील बदलामुळे शेती करणे आव्हानात्मक झाले आहे. म्हणजेच आता आपणास शेती उत्पादन वाढवण्यासाठी व त्यांचा दर्जा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे अपरिहार्य आहे. अशावेळी कृषी पदवीधरांसाठी संधी कोणत्या क्षेत्रात आहेत ते पाहूया.

ड्रोन तंत्रत्रान :

२०० लिटर पाणी एका एकरामध्ये शेतमजुराच्या सहाय्याने फवारणी करण्यासाठी ३ ते चार ४ लागतात. हेच काम ड्रोन २० मिनिटांत करतो, तेवढ्याच खर्चात करतो. म्हणजे वेळ व पैशाची बचत होते. सध्या कृषी ड्रोन व त्याची नियमावली शासन स्तरावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशावेळी प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटर यांची बाजारात मागणी वाढणार आहे. म्हणून ड्रोन क्षेत्रात खालील नोकरीच्या संधी आहेत.

१. ड्रोन वैज्ञानिक:-

शेतीमध्ये औषधे फवारणी, पिकांची अवस्था व निरीक्षणे नोंदवणे अशा प्रकारचे कामाचे स्वरूप आहे.

२. ड्रोन इंजिनीअर:-

गरज आधारित ड्रोनचे प्रारूप तयार करणे व त्यांची निर्मिती करणे हे कामाचे स्वरूप आहे.

४ . ड्रोन परीक्षक:-

ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देणे यामध्ये सुद्धा आपण काम करू शकतो.

एआय तंत्रज्ञान:

भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाईल असा तज्ञांचा अंदाज आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान व बांधकाम या क्षेत्रामध्ये एआयचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. शेतीमध्ये सुद्धा भविष्यात याचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. एआय हा विकसित भारत २०४७ चा एक प्रमुख घटक आहे. माझ्या मते जसे २००९ मध्ये बिटकॉइन हा शब्द व त्याबद्दलची माहिती सामान्य लोकांना होती. तीच आज एआय तंत्रज्ञानाबद्दल आहे. २००९ ते २०२५ मध्ये सर्वांना बिटकॉइन एक चमत्कार वाटतो. तीच परिस्थिती एआय च्या बाबतीत २०४७ मध्ये होईल अशी माझी धारणा आहे. (बिटकॉइन एक उदाहरण आहे याचा इतर गोष्टींशी संबंध नाही) म्हणून आपल्याला या क्षेत्रात कोणते करिअर पर्याय आहेत ते पाहू.

१. कृषी सल्लागार:-

एआय तंत्रज्ञानाला पूरक पीक स्वरूप तयार करणे व त्यांचे मार्गदर्शन करणे.

२. कृषी माहिती तंत्रज्ञान अधिकारी:-

शेतीमधील प्रायोगिक नमुने तयार करणे व त्यांचे मोठ्या प्रमाणात सद्यास्थितीला पिकांमध्ये विश्लेषण करणे.

३. कृषी एआय अभियंता:-

विविध सॉफ्टवेअर तयार करणे, भाषा लर्निंग तंत्रप्रणाली विकसित करणे तसेच साईट स्पेसिफिक निदान शोधणे इत्यादी.

४. एआय तक्रार निवारण अधिकारी:-

तंत्रज्ञानामधील त्रुटी दूर करणे.

कृषी एआय बाजारपेठ २०२२ मध्ये एक अब्ज अमेरिकन डॉलर होती, ती २०३० पर्यंत अंदाजे सात अब्ज अमेरिकेत डॉलर होईल असा अंदाज आहे . एआय तंत्रज्ञानाबद्दल पॅरिस येथे संमेलन भरले आहे. यामध्ये प्रामुख्याने एआय मध्ये मानवी जीवनात कसा बदल होत आहे याचे विवेचन चालू आहे. त्यामध्ये एआय मध्ये नोकऱ्या कमी होतील ही एक आशंका आहे. पण माझ्या मते शेतीमध्ये येत्या दहा वर्षात एक लाख नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

कृषी रोबोटिक्स :

भारतीय लोकसंख्या सध्या प्रथम क्रमांकावर आहे.पण ज्यावेळी शेतकरी शेतमजूर शोधत असतो त्यावेळी मजूर मिळत नाही. याचा अर्थ कार्य कुशल मजुरांची संख्या कमी आहे. यालाच उपाय म्हणून रोबोट काम करू शकतो. काफ (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्स) ने दिलेल्या माहितीनुसार भारत रोबोटिक्स मध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

१. कृषी ड्रोन ऑपरेटर :-

पिकांची देखभाल माहिती संकलन ऑपरेटिंग इत्यादी कार्य आहे.

२. संशोधन व विकास अधिकारी :-

पिकांची लागवड व शेततळे यांचा विचार करून तसे तंत्रज्ञान विकसित करणे.

३. अभियंता :-

रोबोट तयार करणे व देखभाल दुरुस्ती करणे.

४. कृषी तंत्रज्ञान सॉफ्टवेअर डेव्हलपर (रोबोट तंत्रज्ञान):-

५. रोबोट डाटा विश्लेषण :-

भारतीय शेतीमध्ये कमाल जमीनधारणा हे रोबोट वापरण्यावर मर्यादा घालत आहे. त्या दृष्टीने भविष्यात त्यावर उपाय शोधले जातील.

६. ड्रोन टेक्नॉलॉजी :-

GIS, GPS, AI, रोबोटिक्स आधुनिक संकल्पना भारतीय शेतीमध्ये झपाट्याने विकसित होत आहेत. या सर्वांचा विचार करता हे एक उत्कृष्ट करिअर म्हणून विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. सध्या भारतामध्ये जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया, स्वीडन, युके, रशिया, डेन्मार्क, फ्रान्स या देशातील कंपन्या वरील क्षेत्रामध्ये काम करत आहेत.

sachinhort. shinde@gmail. com

Story img Loader