MPSC Medical Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करु शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय भरती २०२३
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब.
शैक्षणिक पात्रता – M.S/ M.D/ M.B.B.S/ D.N.B.
हेही वाचा- १२ वी पास, B.com आणि मेडिकल उमेदवारांना नोकरीची संधी! NHM रायगड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
- खुला – ७१९ रुपये.
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – ४४९ रुपये.
अधिकृत वेबसाईट –
https://mpsc.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक –
https://mpsconline.gov.in/candidate
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १२ डिसेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जानेवारी २०२४
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/15LVLUG5lR8-MGbkoKLIrlicdqGVtVPF2/view