MPSC Bharti 2025 Details चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी येथे लक्ष द्या. कारण एमपीएससी अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३२० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किती जांगासाठी भरती

एकूण ३२० जागांसाठी एमपीएससीनं अर्ज मागवले आहेत. यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ या संवर्गासाठी २२५ जागा आहेत, यामध्ये ९ जागा या दिव्यांगासाठी आरक्षित आहेत. यासाठी स्वतंत्र जाहिरात तर विविध विषयातील विशेषज्ञ संवर्ग या पदासाठी ९५ जागांसाठी भरती होणार आहे, यासाठी देखील स्वतंत्र जाहिरात काढण्यात आली आहे

फी किती?

अर्ज सादर करताना खुल्या प्रवर्गासाठी ७१९ रुपये इतकी फी आहे.
तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ, दिव्यांगांना ४४९ रुपये इतकी फी आहे.
ऑनलाईन आणि ऑफलाईन चलनाद्वारे अशा दोन मोडमध्ये फी भरता येणार आहे

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc department recruitment 2025 vacancy details mpsc bharti 2025 details application process begins tomorrow srk