रोहिणी शहा
नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पर्यावरण या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे: ‘पर्यावरण पारिस्थितीकी, जैवविविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण मुद्दे’
राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मागील वर्षांमध्ये पर्यावरण घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास तयारी कशी करावी याबाबत दिशा स्पष्ट होते. या घटकावर मागील तीन वर्षांत विचारण्यात आलेले काही प्रश्न पाहू.
प्रश्न १. जोडय़ा लावा.
पर्यायी उत्तरे :
१) अ – I ; ब – iv ; क – iii; ड- ii
२) अ – ii; ब – iv ; क – i; ड- iii
३) अ – iv; ब – ii; क – i; ड- iii
४) अ – i; ब – iii; क – ii; ड- iv
प्रश्न २. घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशांमध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात ———- मध्ये —————— येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या करण्यात आल्या.
१) मार्च १९९९, जर्मनी
२) एप्रिल १९८०, जपान
३) मे १९७९, नार्वे
४) मार्च १९८९ – स्वित्र्झलड
प्रश्न ३. अल्फा, बिटा व गॅमा (Alpha, Beta and Gamma) विविधता म्हणजे काय?
अ. सजीवांची श्रीमंती
ब. सिम्पसन विविधता सूची
क. जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण
ड. व्हीटाकेर (Whittaker) (१९७२) यांनी सुचवलेले शब्दार्थ
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?
१) फक्त अ आणि ब
२) फक्त ब
३) फक्त क
४) फक्त क आणि ड
प्रश्न ४. ओझोनमध्ये घट झाल्यामुळे जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात?
अ. माणसाच्या रोग प्रतिकारक क्षमतेचे नुकसान
ब. वनस्पतींची वाढ खुंटणे
क. तापमानात वृद्धी
ड. मोतीबिंदू होण्याचे कारण
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ आणि ब
२) फक्त ब फक्त क आणि ड
३) फक्त ब, क आणि ड
४) वरील सर्व
प्रश्न ५. वसतिस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते?
अ. निर्वनीकरण
ब. दलदलींचे पुन:प्रापण
क. जमिनीच्या वापरात होणारे बदल
ड. उदरनिर्वाह शेती
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ आणि ब
२) फक्त ब फक्त क आणि ड
३) फक्त ब, क आणि ड
४) वरील सर्व
प्रश्न ६. UNEP च्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोडय़ा लावा.
पर्यायी उत्तरे
१) अ – i ; ब – ii; क – iii; ड- iv
२) अ – iv; ब – iii; क – ii; ड- i
३) अ – iii; ब – i; क – iv; ड- ii
४) अ – iii; ब – i; क – ii; ड- iv
वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे तयारीसाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.
या घटकावर दरवर्षी पाच प्रश्न विचारण्यात येतात.
अभ्यासक्रमामध्ये नमूद केल्याप्रमाणे या घटकाचा विशेष अभ्यास न करता उत्तरे देता येतील असे प्रश्नांचे स्वरुप आहे. म्हणजेच या विषयाच्या मूलभूत संकल्पना आणि चालू घडामोडी यांच्या अभ्यासाच्या आधारे कामन सेन्स वापरून या प्रश्नांची उत्तरे देता येतात.
सन २०१८ पर्यंत सरळसोट, एका वाक्यात/ शब्दात उत्तरे द्या अशा प्रकारच्या प्रश्नांचे प्रमाण जास्त होते. मात्र २०१९ पासून बहुतांश प्रश्न हे बहुविधानी, जोडय़ा लावा अशा प्रकारचे आहेत.
मूलभूत संकल्पना, त्यांचे उपयोजन, पारंपरिक मुद्दे आणि चालू घडामोडी अशा सर्वच आयामांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले दिसून येतात.
इतर घटकांपेक्षा या घटकाला कमी प्रश्न आणि महत्व दिलेले असले तरी विश्लेषण करून मुद्देसूद अभ्यास केल्यास विज्ञानाप्रमाणेच या घटकातही पूर्ण गुण मिळवता येऊ शकतात. वरील विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी कशी करावी याबाबत पुढील लेखामध्ये पाहू.