अर्थव्यवस्था घटकातील अर्थव्यवस्थेतील गतिमान क्षेत्रे व मुद्दे यांच्या तयारीबाबत या लेखामध्ये पाहू.

उद्योग व सेवा क्षेत्र

आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्त्व व भूमिका हा मुद्दा एकूणच उद्योग क्षेत्राचा विचार करून अभ्यासायचा आहे. यामध्ये मोठे, मध्यम, लघु व सूक्ष्म उद्याोग, स्वयंरोजगार असे सर्व आयाम लक्षात घेणे आवश्यक आहे.

Who is Trishneet Arora
Success Story: बारावी नापास व्यक्तीने अवघ्या १९ व्या वर्षात उभी केली करोडोंची कंपनी; क्लायंट लिस्टमध्ये अंबानींच्या कंपन्यांचाही समावेश
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती
mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भारतीय अर्थव्यवस्था – मूलभूत संकल्पना
Indian economy current affairs
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्था चालू घडामोडी
Indian culture Cambodia: ९०० वर्षे जुनी द्वारपालांची शिल्पं सापडली; कंबोडियात उलगडला भारतीय शिल्पकलेचा वारसा!
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?

उद्याोगांच्या वृद्धीचे स्वरूप अभ्यासताना त्यांचा growth pattern हा इंग्रजी अभ्यासक्रमातील उल्लेख महत्त्वाचा आहे. उद्याोगांची वृद्धी कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या राज्यांत, कोणत्या कालावधीमध्ये झाली असे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतातील मोठ्या उद्योगांची संरचना अभ्यासताना उद्याोगांचा स्थानिक विस्तार, त्याचे अर्थव्यवस्थेतील योगदान विचारात घ्यावे.

आजारी उद्योगांमागची कारणे, उपाय यांचाच भाग म्हणून औद्याोगिक निकास धोरण अभ्यासायला हवे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याोग (MSME) अभ्यासताना या उद्याोगांच्या व्याख्या, निकष, अर्थव्यवस्थेतील (रोजगार निर्मिति, GDP, परकीय व्यापार यातील वाटा) योगदान, समस्या, कारणे, परिणाम हे मुद्दे पाहावेत.

१९९१च्या पूर्वीची व नंतरची औद्याोगिक धोरणे पुढील मुद्यांच्या आधारे अभ्यासावीत: धोरणाचा कालावधी, पार्श्वभूमी, उद्दिष्टे, ठळक तरतुदी, मूल्यमापन

भारतातील सेवा क्षेत्राची रचना व वृद्धी इतकेच मुद्दे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असले तरी सेवा क्षेत्राचा भारतातील अर्थव्यवस्थेतील (रोजगार निर्मिती, GDP, परकीय व्यापार यातील) वाटा, सेवा क्षेत्रासमोरील समस्या, कारणे, परिणाम व उपाय, सेवा क्षेत्राच्या विकासासाठीचे शासकीय प्रयत्न हे मुद्देही पाहायला हवेत.

हेही वाचा : Success Story: बारावी नापास व्यक्तीने अवघ्या १९ व्या वर्षात उभी केली करोडोंची कंपनी; क्लायंट लिस्टमध्ये अंबानींच्या कंपन्यांचाही समावेश

भारतीय श्रम क्षेत्राच्या समस्या, त्यांची कारणे, स्वरूप, परिणाम, उपाय या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. श्रामिकांसाठीच्या सामाजिक सुरक्षा योजना, श्राम क्षेत्रातील सुधारणा हा पारंपरिक आणि चालू घडामोडी असे दोन्ही आयाम असलेला मुद्दा आहे.

पायाभूत सुविधा विकास

पायाभूत सुविधांचे प्रकार, आवश्यकता, महत्व, विकासातील समस्या, कारणे, उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करता येईल.

पायाभूत सुविधांसाठीचा वित्त पुरवठा हा मुद्दा आवश्यकता, समस्या, आव्हाने आणि सार्वजनिक – खाजगी क्षेत्र भागीदारी (PPP), थेट परकीय गुंतवणूक व विकासाचे खाजगीकरण इत्यादी पर्याय या मुद्यांच्या आधारे अभ्यासावा. याबाबतची सध्या लागू असलेली व ठळकपणे योगदान देणारी जुनी अशा दोन्ही प्रकारची केंद्र आणि राज्य सरकारची शासकीय धोरणे यांचा अभ्यास आवश्यक आहे.

सहकार

सहकार ही संकल्पना, तिचा अर्थ, विकास, तिची उद्दिष्टे, सहकाराची नवीन तत्त्वे हे पारंपरिक मुद्दे आधी अभ्यासायला हवेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण लक्षात घ्यावे.

सहकार क्षेत्राबाबत राज्याचे धोरण आणि कायदे, यांतील तरतुदी समजून घ्यायला हव्यात.

सहकारी संस्थांचे पर्यवेक्षण, लेखापरीक्षण याबाबतच्या तरतुदी माहित करून घ्याव्यात.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासमोरील समस्या अभ्यासताना सर्वसाधारणपणे या क्षेत्रालाच जाणवणाऱ्या समस्या आणि विशिष्ट क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या स्वत:च्या समस्या अशा दोन्ही आयामांनी विचार करावा. या समस्यांची करणे, स्वरूप, परीणाम आणि उपाय असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहकाराचे भवितव्य हा मुद्दा विश्लेषणात्मक आणि चालू घडामोडींवर आधारीत असा आहे. याच्या तयारीसाठी संकल्पनात्मक अभ्यास पक्का असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’ संस्थेत विविध पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

राज्यातील कृषी, उद्याोग व सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये, त्यांचे राज्याच्या रोजगार निर्मिती, GDP, परकीय व्यापार यातील योगदान, त्यांची अद्यायावत आकडेवारी असे मुद्दे पाहायला हवेत.

महाराष्ट्र सरकारची कृषी, उद्याोग व सेवा क्षेत्रासाठीची धोरणे अभ्यासताना त्यांची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, साध्ये, मूल्यमापन हे मुद्दे पाहावेत.

उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र हा मुद्दा त्या-त्या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालामधून अभ्यासणे व्यवहार्य ठरेल.

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल:

वृद्धीचे इंजिन स्वरूपात आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अर्थव्यवस्थेतील वृद्धीमधील महत्त्व/ योगदान आणि वृद्धीतील परकीय भांडवल व तंत्रज्ञानाची भूमिका अशा अर्थाने अभ्यासावा.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अभिजात व आधुनिक सिद्धांत हे सिद्धांत तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काढून उदाहरणांच्या आधारे अभ्यासले तर समजणे व लक्षात ठेवणे सोपे होईल.

आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था आणी क्षेत्रीय व्यापार करार यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा:

स्थापनेमागील हेतू, उद्दिष्टे, स्थापनेचे वर्ष, भारत सदस्य आहे का? असल्यास भारताची यांमधील भूमिका, त्यांचे आंतरराष्ट्रीय व भारतासाठीचे योगदान

जागतिक व्यापार संघटनेची आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणुकीमधील भूमिका, तिचे नियम, याबाबत उद्भवणारे मुद्दे व चालू घडामोडी पाहायला हव्यात. या अनुषंगानेच व्यापारविषयक बौद्धिक संपदा आणि गुंतवणूक उपाय हे मुद्दे अभ्यासावेत.

हेही वाचा : Success Story Of Tathagat Avatar Tulsi : एकेकाळी चाइल्ड प्रॉडिजी म्हणून होती ओळख; पण आज आहेत… वाचा तथागत अवतार तुलसी यांची गोष्ट

व्यापार आणि भांडवल

भारताच्या परकीय व्यापाराची वृद्धी, रचना आणि दिशा हे मुद्दे संकल्पना समजून घेतल्यावर आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीच्या आधारे नोट्स काढून अभ्यासावेत.

विदेशी भांडवल प्रवाहाची रचना व वृद्धी हा पारंपरिक मुद्दा आहे. टप्प्याटप्प्याने यामध्ये झालेले आणि होणारे बदल समजून घ्यायला हवेत.

शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक, परकीय व्यापारी कर्ज (ECBS) यासारखे परकीय गुंतवणुकीचे पर्याय व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. त्यांचे स्वरूप, महत्त्व, त्यांच्या बाबत बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका, भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्यांचा परीणाम हे मुद्दे विचारात घ्यावेत.

आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था व त्यांचेकडून भारताला देण्यात येणारे पत मानांकन, या पत मानंकनाचा परकीय गुंतवणुकीवर होणारा परीणाम हे मुद्दे व्यवस्थित समजून घ्यावेत.

भारतातील विनिमय दर व्यवस्थापनाच्या वाटचालीतील ठळक टप्पे, सध्याचे व्यवस्थापन, त्यातील महत्त्वाच्या तरतुदी, विनिमय दरांचे प्रकार, त्यांतील बदलांचे परिणाम, त्यांतील समस्या, कारणे असे मुद्दे पाहायला हवेत.

हेही वाचा : अंबानी, अदानी यांच्यापेक्षाही श्रीमंत व्यक्तीनं एकेकाळी केलं होतं वेटरचं काम; वाचा प्रसिद्ध कंपनीच्या सीईओचा प्रवास

परकीय व्यापार धोरणे, निर्यात प्रोत्साहन उपक्रम यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा: पार्श्वभूमी, कालावधी, उद्दिष्टे, ठळक तरतुदी, मूल्यमापन.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com