रोहिणी शहा
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील घटकांच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखापासून पेपर दोनच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमध्ये सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन हा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे:
1) General Science (Physics,Chemistry,Botany,Zoology)
2) Nature Conservation
2.1.1 Soils: – Physical, chemical and biological properties. Processes and factors of soil formation. Mineral and organic constituents of soil and their role in maintaining soil productivity. Soil profile. Problem soils and their reclamation.
2 Soil and moisture conservation:- Causes of soil erosion, method of control, role of forest, characteristics of and steps in Watershed Management.
2.2.1 Eco Systems: – Types, food chain, food web, ecological pyramids, energy flow, biogeochemical cycle of carbon and nitrogen.
2 Manures and Fertilizers:- Types, organic – inorganic.
3 Diseases and pests of plants and animals.
4 Pesticides and insecticides.
5 Injurious plants and weeds.
2.3 1 Environmental Pollution:- Types, control, bio-indicators, endangered species,.
2 Environmental problems related to quarrying and mining.
3 Greenhouse effect, Carbon trading, Climate Change.
2.4.1 Important wild animals of India.
2 Breeds of cattle, Economics of fodder and pasture of grassland management.
2.5.1 Important indigenous trees species of India, exotic plants, plants as a source of forest products such as food, fibre, fuel wood, timber, non-timber, forest produce/minor forest produce. Medicinal plants, Energy plantations, Mangroves, Forest based industries.
2 Factors effecting growth and distribution of plants. Forest types of India.
2.6.1 National parks and Sanctuaries, World heritage sites.
2 Social forestry, Joint Forest Management, Agro forestry.
3 Indian forest policy, Indian Forest Act, Wild Life Protection Act, Forest Conservation Act, 1980.
4 National and International Organization working for nature conservation.
2.7.1 Use of aerial photographs, thematic maps. Satellite imageries, Principle and application of GIS.
2 Biodiversity, causes of loss of biodiversity, importance of biodiversity conservation.
3 Plants breeding, tissue culture. Tribals and forests. Important tribes of India.
या अभ्यासक्रमावर मागील वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात येतात. या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासाची नेमकी दिशा ठरविण्यास मदत होते.
सामान्य अध्ययन घटकातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र यांमध्ये मूलभूत संकल्पनांवर आधारीत प्रश्न विचारण्यात आले आहेत.
रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाच्या संयुगांची रेणूसूत्रे, गुणधर्म, उपयोग इत्यादी विचारण्यात आले आहेत. भौतिकशास्त्रातील बल, विद्युत इत्यादी बाबींवर समीकरणे विचारण्यात आली आहेत तर रसायनशास्त्रातील महत्त्वाच्या अभिक्रिया विचारण्यात आल्या आहेत.
वनस्पती व प्राणीशास्त्रातील वर्गीकरण, विविध वर्गातील वनस्पती / प्राण्यांची वैशिष्टय़े, वनस्पतींसाठीची पोषक द्रव्ये, त्यांचे रोग यावर प्रश्न विचारलेले आहेत.
मृदा या घटकावर अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या प्रत्येक मुद्दय़ाचा अभ्यास आवश्यक आहे. यातील प्रत्येक घटकावरील प्रश्नाचा समावेश दरवर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला दिसून येतो.
पर्यावरण आणि जीवशास्त्रातील मूलभूत संकल्पना, महत्त्वाच्या अभ्यासशाखा व त्यांचे विषय विचारण्यात आले आहेत.
पर्यावरण आणि वने याबाबतच्या राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडींवर प्रश्न विचारलेले आहेत.
वने आणि पर्यावरण यांचेशी संबंधित कायदे, आदिवासी व जंगल संवर्धन यांसाठीच्या योजना यांमधील तरतुदी नेमकेपणाने माहीत असणे आवश्यक आहे.
परिस्थितिकी घटकातील अन्न साखळी व जाळे, जैवरासायनिक चक्रे, खते, वनस्पतींवरील रोग, कीटकनाशके या मुद्दय़ांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत.
निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे कार्य, उद्दीष्टे, स्थापना या मुद्दय़ांचा प्रश्नांमध्ये समावेश आहे.
Aerial photographs,thematic maps.Satellite imageries,Principle and application of GIS या मुद्दय़ांवर चालू घडामोडी, मूलभूत संकल्पना आणि तांत्रिक आयामांवर प्रश्न विचारलेले आहेत.
वरील विश्लेषणाच्या आधारे पेपर दोनचा अभ्यास कशा प्रकारे करावा याची चर्चा पुढील लेखांमध्ये करण्यात येईल.