हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रवीण चौगले
स्वातंत्र्यानंतर भारताने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, फाळणीच्या वेदनादायी घटनेला सामोरे जावे लागूनही भारत एक मजबूत, शक्तिशाली महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने विविध क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. लोकशाही टिकवून ठेवणे ही सर्वात मोठी कामगिरी आहे. आज समकालीन अर्थव्यवस्थामध्ये भारतीय अर्थव्यवस्था दुसरी सर्वात वेगाने विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे, करोडो लोकांना गरिबीतून बाहेर पडण्यास मदत केली आहे, मजबूत परराष्ट्र धोरण निर्माण केले. तसेच भारत एक महत्त्वाची अंतराळ आणि आण्विक शक्ती बनला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कालखंड अभ्यासणे आवश्यक ठरते.
स्वातंत्र्यानंतरचा काळ आकलनाच्यादृष्टीने इतिहासाच्या तुलनेत सोपा आणि सरळ आहे. ज्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या घटनांचा संग्रह आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की एक प्रश्न २-३ वर्षांच्या अंतरानंतर येतो. परिणामी हा घटक इतका महत्त्वाचा नाही. तरीही आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने याची तयारी करून ठेवणे आवश्यक आहे. हा घटक मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचा असल्याने पूर्व परीक्षेसाठी तयारी करण्याची आवश्यकता नाही. मुख्य परीक्षेमध्ये प्रश्नाचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तिनंतरच्या पुढील दोन दशकातील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतच्या पहिल्या दोन दशकातील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आणि त्यांची उत्तरे नेमकी कशी लिहावी, याची एक योग्य दिशा मिळते. याचबरोबर या विषयाची तयारी कशी करावी याची एक स्पष्ट आखणी करता येते. १९४७ पासून परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक घटक पुढीलप्रमाणे:
नेहरू युग (१९४७-१९६४)
संस्थानांचे एकीकरण, अधिकृत भाषेचा मुद्दा, राज्यांची भाषिक पुनर्रचना, चीनशी संबंध (१९६२ चे भारत-चीन युद्ध), आदिवासींचे एकत्रीकरण, नेहरूंचे पंचशील धोरण, नेहरूंच्या अंतर्गत परराष्ट्र धोरण (अलिप्ततावादी चळवळ). नेहरू युगावर विचारलेला प्रश्न पुढील प्रमाणे.
प्रश्न. Assess the main administrative issues and socio- cultural problems in the integration process of Indian Princely States.
शास्त्रींचा काळ (१९६४-१९६६)
भारत-पाक युद्ध, ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेची उत्क्रांती, ताश्कंद घोषणा, कार्यालयीन भाषेचा मुद्दा.
इंदिरा गांधी युग (१९६६-१९८४)
राज्य पातळीवर युतीचे राजकारण, काँग्रेसमध्ये फूट, १९७१ चे बांगलादेश मुक्ती युद्ध, जे. पी. चळवळ, अणू चाचणी, आणीबाणी, जनता पक्षाचे सरकार, बँकांचे राष्ट्रीयीकरण, काश्मीर प्रश्न, आसामचा मुद्दा, ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या.
प्रश्न. Critically examine the compulsions which prompted India to play decisive roles in the emergence of Bangladesh.
प्रश्न. Analyze the circumstances that led to Tashkent Agreement in 1966. Discuss the highlights of the agree.
वरील दोन्ही प्रश्न हे भारताबरोबर पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धाच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपणाला भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलिनीकरण याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी याचीही माहिती असणे गरजेचे आहे व तत्कालिन नेमकी कोणती करणे होती इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे लिहिता येत नाहीत. तसेच, ताश्कंद कराराची वैशिटय़ नेमकी काय होती याची थोडक्यात माहिती असणेही गरजेचे आहे. हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि वस्तुनिष्ठ माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून सोडवावेत.
राजीव गांधींचा काळ (१९८५ -१९८९)
माहिती तंत्रज्ञान क्रांती, पक्षांतरविरोधी कायद्यासारखे राजकीय उपाय, श्रीलंकन गृहयुद्ध, शाह बानो प्रकरण, बोफोर्स घोटाळा, पंचायती राज, हुंडा प्रतिबंधक कायदा, लष्कराचे आधुनिकिकरण इ.
इतर घटक
१९९१ च्या आर्थिक सुधारणा, मंडल आयोग, १९९९ चे कारगिल युद्ध, जमीन सुधारणा, भूदान आणि ग्रामदान चळवळ, हरित क्रांती, सहकारी संस्थांचा उदय, महिला चळवळ, दलित चळवळी, पर्यावरणीय चळवळ, भारताचे आण्विक धोरण इ.
प्रश्न. Critically discuss the objectives of Bhoodan and Gramdan movements initiated by Acharya Vinoba Bhave and their success.
या घटकाची तयारी करताना सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता १२ वीचे राज्यशास्त्राचे ‘पोलिटीक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडस’ हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करण्यासाठी बिपिन चंद्र लिखित ‘इंडिया आफ्टर इंडिपेंडस’ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात.