महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जाहिरात क्र. ०४८/२०२४) आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जाहिरात क्र. ०४९/२०२४) ९ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर केल्या होत्या. दि. २३ डिसेंबर २०२४ च्या शुद्धिपत्रकानुसार या दोन्ही जाहिरातींस अनुसरून शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-२०२४/प्र.क्र. ३९/का. १२ (सेवा) २० डिसेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहीत कमाल वयोमर्यादेत ( १ फेब्रुवारी २०२५ रोजी) एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे.
उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याच्या विहीत दिनांकास (१ फेब्रुवारी २०२५ रोजी) केवळ वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जाहिरातीस अनुसरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास ६ जानेवारी २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दोन्ही परीक्षांचा सुधारित दिनांक पुढील प्रमाणे –
जाहिरात क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ – २ फेब्रुवारी २०२५.
जाहिरात क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ – ४ मे २०२५.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https:// mpsconline. gov. in तसेच https:// mpsc. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
suhassitaram@yahoo.com
नोटीस बोर्ड
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण (एनटीए) नीट परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. neet. nta.. nic. in आणि nta. ac. in या संकेतस्थळांवर हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
राज्यातल्या अभियांत्रिकी प्रवेशांसाठी होणाऱ्या एमएचटी – सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन अर्जांना सुरुवात झाली आहे. ९ ते २७ एप्रिल या कालावधीत ही परीक्षा होईल. cetcell. mahacet. org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
यूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड राष्ट्रीय चाचणी संस्थेने जारी केले आहे. ही परीक्षा ३ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधी होणार आहे. ugcnet. nta. ac. in या संकेतस्थळावर उमेदवारांना अॅडमिट कार्ड उपलब्ध होईल.
ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट अर्थात ‘गेट २०२५’ परीक्षा यंदा आयआयटी रुरकी घेणार आहे. संस्थेने विषयनिहाय वेळापत्रक जारी केले आहे.