राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील कृषी घटक हा दोन पेपर्समध्ये विभागलेला आहे. शेतीच्या भौगोलिक, हवामानविषयक बाबी पेपर एकमध्ये भूगोल घटकाबरोबर तर शेतीतील आर्थिक बाबी आणि अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व पेपर चारमध्ये अर्थव्यवस्था या घटकामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या दोन्ही पेपर्समध्ये मिळून या घटकाचा सविस्तर अभ्यासक्रम या लेखामध्ये पाहू.

सामान्य अध्ययन पेपर एक

२. आर्थिक भूगोल

आर्थिक व्यवसाय शेती – महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप

उच्च उत्पन्न देणान्या जाती (HYV) शेतीची आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, कृषीविषयक शासकीय धोरण

मासेमारी मत्स्य व्यवसाय- भूप्रदेशाअंतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण

३. कृषी

३.१ कृषी परिसंस्था :

परिसंस्थेची संकल्पना, रचना आणि कार्य

परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह

परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म

जैवविविधता, तिचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन, संवर्धित शेती

नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका

पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी

कार्बन क्रेडिट : संकल्पना, कार्बन क्रेडिटची देवाण घेवाण, कार्बन जप्ती (Sequestration), महत्त्व, अर्थ आणि उपाय/ मार्ग

पर्यावरणीय नीतीतत्वे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ. आम्ल वर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात सर्वनाश (होलोकॉस्ट) आणि त्यांचा कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील परिणाम. आकस्मिक पीक नियोजन

३.२ मृदा

मृदा एक नैसर्गिक घटक, मृदाविषयी अध्यापनशास्त्रीय व भूमीशास्त्रीय संकल्पना

मृदानिर्मिती: मृदा निर्मिती करणारे खडक आणि खनिजे

मृदा तयार होण्याची प्रक्रिया व कारके

जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म

जमीनीचा उभा छेद आणि मृदा घटक

जमीन (मृदा) वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्त्रोत, आवश्यक आणि लाभदायक वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि त्यांचे कार्य, जमिनीतील पोषक वनस्पती अन्नद्रव्यांची स्वरूपे

जमिनीतील सेंद्रीय पदार्थ : स्त्रोत, स्वरुपे, गुणधर्म, जमिनीतील सेंद्रीय पदार्थावरील परिणामकारक घटक, सेंद्रीय पदार्थाचे महत्त्व आणि जमिनीच्या गुणधर्मावर होणारे परिणाम.

जमिनीतीन सजीव सृष्टी : स्थूल (Macro) आणि सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी, त्याचे जमीन आणि वनस्पतीवरील लाभदायक व हानीकारक परिणाम

जमिनीचे प्रदूषण: प्रदूषणाचे स्त्रोत, कीटकनाशके, बुरशीनाशके, इत्यादींचे दूषित करणारे अजैविक घटक, त्यांचा जमिनीवर होणारा परिणाम. जमीन प्रदूषणाचे प्रतिबंध आणि शमन

खराब / समस्याग्रस्त जमिनी आणि त्या लागवडी योग्य करण्यासाठी उपाययोजना

रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस (GIS) यांचा खराब / समस्याग्रस्त जमिनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरिता वापर

जमिनीची धूप, त्याचे प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय

सेंद्रीय शेती

अतिसुक्ष्म तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी) आणि अचूक काटेकोर शेती

जलव्यवस्थापन :

जल विज्ञान चक्र

पावसावलंबी आणि कोरडवाहू शेती

जलसंधारणाच्या पद्धती

पाण्याचा ताण/ दुष्काळ व पीक निवारण

पावसाचे पाणी अडवणे आणि साठवणे

पाणलोट क्षेत्राची संकल्पना, उद्दिष्ट्ये, तत्त्वे, घटक आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनावर परिणाम करणारी कारके

! सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदूषण आणि औद्याोगिक दूषित पाण्याचा परिणाम

त्र पाणथळ जमिनीचे जलनिस्सारण

सिंचनाचे वेळापत्रक ठरविणारे निकष, पाणी वापराची आणि सिंचन कार्यक्षमता

नद्यांची आंतरजोडणी (नद्या जोड प्रकल्प)

सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी

सिंचन पद्धती आणि सिंचनाबरोबर/ सिंचनाद्वारे खते देणे

सामान्य अध्ययन पेपर चार

२.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास:

आर्थिक विकासात शोतीची भूमिका: शेती, उद्याोग व सेवा क्षेत्रांमधील आंतरसंबंध, भारतातील कृषी विकासातील प्रादेशिक आसमानता.

( शेतीचे प्रकार – कंत्राटी शेती, उपग्रह शेती, कार्पोरेट शेती, सेंद्रिय शेती

) कृषी उत्पादकता – हरित क्रांती व तंत्रज्ञान विषयक बदल, जनुकीय सुधारणा तंत्रज्ञान, कृषी किंमत निर्धारण, कृषी विपणन, शेती पतपुरवठा व नाबार्ड

* जलसिंचन आणि जलव्यवस्थापन

+ पशुधन आणि त्याची उत्पादकता: भारत व महाराष्ट्रातील धवल क्रांती, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण, फलोत्पादन, पुष्पोत्पादन विकास.

, कृषी अनुदान: आधार किंमत आणि संस्थापक उपाय, सार्वजनिक वितरण व्यवस्था – अन्न सुरक्षा – कृषी विपणना-वरील गॅट (GATT) कराराचे परिणाम

– ग्रामविकास धोरणे – ग्रामीण पायाभूत संरचना (सामाजिक आणि आर्थिक)

२.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

. कृषी क्षेत्राची वैशिष्ट्ये, महाराष्ट्र सरकारची कृषी क्षेत्रासाठीची धोरणे, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन, उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र

२.१० कृषी:

१. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व

/ कमी उत्पादनक्षमतेची कारणे – राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान. मूलभूत शेतीविषयक निविष्ठाची माहिती, शेतीचे आकार आणि उत्पादकता, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे. कृषी उत्पादन वाढीसाठी इतर शासकीय धोरणे, योजना आणि कार्यक्रम जसे जमीन सुधारणे आणि जमीन वापर, मृद आणि जलसंधारण, पर्जन्य शेती, सिंचन आणि त्याच्या पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण, सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी. कृषी कर आणि जीएसटी. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषी विषयक विविध करार (WTO), पीक विमा योजना आणि त्यांची वाटचाल, भारतीय कृषी अनुसंधान परिषद ( ICAR) आणि महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषद ( MCAER) यांचे कृषी क्षेत्रातील कार्य.

२. ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पत पुरवठा

0 भारतीय कृषी क्षेत्रात कर्जांची गरज, भूमिका व महत्त्व, कृषी पतपुरवठ्याचे वर्गीकरण, पुरवठा करणारे स्त्रोत, वाणिज्य आणि सहकारी बँक, नाबार्ड, ग्रामीण बँक इत्यादी संस्था, कर्ज परतफेडीचे प्रकार, किसान क्रेडीट कार्ड योजना

1 कृषी मूल्य – कृषी मूल्यांचे विविध घटक आणि विविध कृषी उत्पादनावर परिणाम करणारे घटक, कृषी मालाच्या विविध शासकीय आधारभूत किमती, केंद्रीय कृषी मूल्य आयोग (CACT). शासकीय विविध कृषीमाल खरेदी, विक्री साठवणूक करणाऱ्या संस्था (NAFED, NCDC etc.)

2 कृषी विपणन, बाजार आणि बाजार रचना, बाजार एकत्रिकरण, कृषी विपणनामध्ये जोखमीचे प्रकार, कृषी विपणनात शासकीय संस्थांची भूमिका (APMC, NAFED, NCDC, ENam )