प्रश्न १. भारतीय जीवन विमा महामंडळाच्य विमा सखी योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१) ग्रामीण महिलांना थेट विमा संरक्षण प्रदान करणे.
२) महिलांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे.
३) १८-७० वर्षे वयोगटातील महिलांसाठी मोफत जीवन विमा पॉलिसी करणे.
४) महिलांना एलआयसी एजंट म्हणून प्रशिक्षण देणे आणि आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देणे
प्रश्न २. माधव गाडगीळ यांना सन २०२४ चा संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार कोणत्या कारणासाठी प्रदान करण्यात आला आहे?
१) विदर्भातील प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींच्या नोंदींबाबतचे कार्य
२) पश्चिम घाट संवर्धनावरील कार्य
३) भारतातील मुंग्यांच्या प्रजातींवर संशोधन
४) हवामान बदल कमी करण्यावर संशोधन
प्रश्न ३. केंद्र शासनाच्या अन्न चक्र टूलबद्दल खालील विधाने विचारात घ्या:
१) याचा वापर अन्न साखळीतील प्रदूषकांचे मोजमाप करण्यासाठी करण्यात येईल.
२) याचा वापर आदीवासी क्षेत्रातील बालकांच्या कुपोषणाचे मोजमाप करण्यासाठी करण्यात येईल.
३) याचा वापर सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून दर्जेदार अन्न पुरवठा करण्यासाठी करण्यात येईल.
४) याचा वापर कृषी मालाच्या पुनर्वापराबाबत (recycling) मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात येईल.
प्रश्न ४. मान्याची वाडी हे गाव कोणत्या कारणासाठी प्रसिद्धी पावले आहे?
१) राज्यातील पहिले कॅशलेस गाव
२) राज्यातील पहिले सौर ग्राम
३) राज्यातील पहिले बालविवाह मुक्त गाव
४) राज्यातील पहिले विधवा प्रथा मुक्त गाव
प्रश्न ५. बाल विवाह मुक्त भारत अभियानाबाबत खालील विधाने विचारात घ्या:
अ. या मोहिमेमध्ये सर्वाधिक बालविवाह दर असलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.
ब. सन २०२५ पर्यंत बालविवाह संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
क. बालविवाहाच्या प्रकरणांवर संनियंत्रणासाठी पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
१) अ आणि ब
२) अ आणि क
३) ब आणि क
४) वरील सर्व.
योग्य उत्तरे व स्पष्टीकरणे:
प्रश्न १ – (४) भारतीय जीवन विमा महामंडळाकडून विमा सखी ही योजना सन २०२४मध्ये सुरू करण्यात आली आहे.
योजनेचे स्वरूप : पात्र महिलांना एलआयसी ( LIC ) एजंट म्हणून काम करण्यासाठी एकूण तीन वर्ष प्रशिक्षण
पहिल्या वर्षी प्रति महिना सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी प्रति महिना ६ हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी ५ हजार रुपये या दराने स्टायपेंड देण्यात येईल.
या कालावधीत महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील आणि स्टायपेंड व्यतिरीक्त कमिशनच्या रुपात मिळणारे पैसे वेगळे असतील.
ज्या महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे अशा महिलांना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येणार आहे.
पात्रता: १० वीपर्यंत शिक्षण पूर्ण.
वय कमीत कमी १७ आणि जास्त ७० वर्षे.
प्रश्न २ – (२) माधव गाडगीळ यांना पश्चिम घाट संवर्धनावरील कार्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन आफ अर्थ पुरस्कार मिळाला आहे. त्यांची अन्य कामगिरी पुढीलप्रमाणे: विदर्भातील आदीवासींच्या मदतीने प्राणि आणि वनस्पतींच्या प्रजातींच्या नोंदी.
बेंगलोर येथे त्यांनी ’सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसची स्थापना.
पश्चिम घाट पर्यावरण अहवाल समिती – गाडगीळ कमिशनचे अध्यक्ष.
पुस्तके: वारूळपुराण; उत्क्रांती एक महानाट्य; सह्याद्रिची आर्त हाक; निसर्गाने दिलेला आनंदकंद; बहरु दे हक्काची वनराई;
Diversity : The cornerstone of life; Ecological Journeys; Ecology and Equity; Nurturing Biodiversity: An Indian Agenda; Peoplel s Biodiversity Registers: A Methodology Manual; This Fissured Land
प्रश्न ३ – (३)
प्रश्न ४ – (२)
मान्याची वाडी हे गाव पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे.
पीएम सूर्य घर योजनेचे स्वरूप : एक कोटी नागरिकांच्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून मोफत वीज देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
घराच्या छतावर १ किलो वॅट रुफ टॉप सोलर सिस्टम बसविण्यासाठी ३०,००० रुपये अनुदान तर २ किलो वॅट रुफ टॉप सोलर सिस्टम बसविण्यासाठी ६०,००० रुपये अनुदान देण्यात येते. आणि ३ किलो वॅट रुफ टॉप सोलर सिस्टम बसविण्यासाठी ७८,००० रुपये अनुदान देण्यात येते.
प्रश्न ५ -(४)