रोहिणी शाह
नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे: ‘राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील वर्षीपासून राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व राजपत्रित संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली. या व त्यामागील राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर एकमध्ये चालू घडामोडी या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास तयारी कशी करावी याबाबत दिशा स्पष्ट होते. या घटकावर मागील पाच वर्षांत विचारण्यात आलेले काही प्रश्न व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू.
● प्रश्न १. अॅमेझॉन जंगलाविषयी योग्य विधान शोधा.
( a) हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहे.
( b) या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे.
( c) या जंगलांनी इक्वेडोरचा ४० टक्के भाग व्यापला आहे.
( d) ह्या जंगलात मकाऊ, ट्युकन्स आणि ब्लॅक स्कीमर्स आहेत.
पर्यायी उत्तरे :
(१) ( a), ( b), ( c), ( d)
(२) ( a), ( b), ( c)
(३) ( a), ( d)
(४) ( a), ( b), ( d)
● प्रश्न २. संघ सरकारने जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्यांकांच्या यादीमध्ये केला आहे. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
( a) देशात आता अधिकृत असे सहा अल्पसंख्यांक समुदाय आहेत.
( b) अल्पसंख्यांक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटनादुरुस्ती मंजूर करणे आवश्यक असते.
( c) भारत सरकारच्या अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाची स्थापना २००९ मध्ये झाली आहे.
वरीलपैकी कोणते विधान ने योग्य आहे/त?
(१) फक्त ( a)
(२) फक्त ( b)
(३) ( b) आणि ( c)
(४) ( a) आणि ( b)
● प्रश्न ३. टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने ‘टाईम पर्सन ऑफ द इयर, २०२१’ साठी खालीलपैकी कोणाची निवड केली ?
(१) मलाला युसूफजाई
(२) रतन टाटा
(३) इलॉन मस्क
(४) कमला हॅरिस
● प्रश्न ४. २०२२-२३ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे?
(१) २० टक्के कर अधिक उपकर (सेस)
(२) २५ टक्के कर अधिक उपकर (सेस)
(३) ३० टक्के कर अधिक उपकर (सेस)
(४) ३५ टक्के कर अधिक उपकर (सेस)
● प्रश्न ५. आरे दुग्ध वसाहती विषयी योग्य विधाने शोधा :
( a) ही वसाहत १९४६ मध्ये तयार झाली.
( b) आरे वसाहतीचे उद्घाटन पं. जवाहरलाल नेहरूंनी केले होते.
( c) आरे जंगलातून १९७० नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली.
( d) याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली.
पर्यायी उत्तरे :
(१) ( a), ( b), ( c) ( d)
(२) ( b), ( c), ( d)
(३) ( b), ( c)
(४) ( b), ( d)
● प्रश्न ६. .जे एन यू चे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदिश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
(१) एन.सी.ई.आर.टी.
(२) यू.जी.सी.
(३) यु.पी.एस.सी.
(४) आय.एस.आर.ओ.
● प्रश्न ७. संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थेने चालवलेले ‘ब्लु हार्ट अभियान’ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
(१) एड्स
(२) देह व्यापार (मानवी देह व्यापार)
(३) अमली पदार्थ
(४) पूर मदत कार्य
वरील विश्लेषणाच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात.
आंतरराष्ट्रीय घटना, राज्य स्तरीय घटना, पुरस्कार, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि व्यक्तिविशेष या मुद्द्यांवर किमान एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
एखाद्या वर्षी बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण जास्त आहे तर एखाद्या वर्षी सरळसोट प्रश्नांचे. त्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास हा सर्व आयाम विचारात घेऊन करणे आवश्यक आहे.
बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण लक्षणीय आहे. आणि या प्रश्नांसाठी मुद्द्याची नेमकी माहिती असणे आवश्यक आहे.
सरळसोट प्रश्नांमध्येही काही वेळा फारसा भर न दिला जाणारा मुद्दा विचारण्याचे प्रमाण वाढत आहे. उदा. चर्चेतील व्यक्तीचे नागरिकत्व किंवा तिने स्थापन केलेली संस्था इत्यादी..
सामान्य अध्ययन घटकाशी संबंधित चालू घडामोडींवर आधारीत प्रश्नांमध्ये त्या घटकातील मूलभूत संकल्पना, पारंपरिक मुद्देही विचारण्यात येतात.