रोहिणी शहा

मनुष्यबळ विकासाचे मूल्यात्मक आणि कौशल्यविषयक आयाम म्हणून शिक्षण व व्यावसायिक शिक्षण हे घटक मागील लेखांमध्ये आपण पाहिले. आरोग्य हा मानवी संसाधनाचा जैविक मुद्दा आहे तर ग्राम विकास हा बहुपेडी व समावेशी मुद्दा आहे. या दोन घटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!
UPSC Preparation UPSC Preliminary Exam Paper I GS
यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर I (GS)
Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?
Ahilya Devi Holkar Solapur University distributes defective blazers to player
विद्यापीठ खेळाडूंना सदोष ब्लेझर वाटप; चौकशीच्या मुद्द्यावर वाद

आरोग्य

भारतामध्ये आरोग्याविषयक घटक आणि समस्या

या घटकामध्ये पोषण, स्वच्छता, रोगनिवारण व नियंत्रण तसेच आरोग्य सुविधा या मुद्दय़ांचा विचार आवश्यक आहे.

जीवशास्त्रामधील पोषण व रोगनिवारण या घटकांचा व्यवस्थित अभ्यास गरजेचा आहे. मानवी वाढीसाठी आवश्यक असलेली पोषक खनिजे, व्हिटॅमिन्स इत्यादींची गरज, स्त्रोत, त्यांच्या अभावाने होणारे रोग यांच्या नोट्स टेबलध्ये घेता येतील.

महत्त्वाचे संसर्गजन्य, साथीचे रोग, त्यांची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व असल्यास त्यांच्या निवारणासाठीच्या शासकीय योजना व त्यांचे स्वरूप अशा सर्व मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यासायला हवेत.

आरोग्यविषयक समस्यांचा स्वरूप, कारणे, परिणाम, उपाययोजना, शासकीय प्रयत्न अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा

या यंत्रणेतील शासकीय यंत्रणा आणि खासगी आरोग्य सुविधा यांचा अभ्यास आवश्यक आहे. अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये यांच्या श्रेणी, दर्जा, यांमध्ये उपलब्ध सुविधा, त्यांचे व्यवस्थापन व नियंत्रण करणारे विभाग यांचा आढावा घ्यायला हवा.

खासगी क्षेत्रातील प्राथमिक ते चतुर्थक अशा वाढत्या श्रेणीच्या आरोग्य संस्थांची वैशिष्टय़े, उपलब्ध उपचार व सुविधा यांचा आढाव आढावा घ्यायला हवा.

जागतिक आरोग्य संघटना

संघटनेचा उद्देश, रचना, कार्ये व कार्यक्रम हे अभ्यासक्रमातील मुद्दे अभ्यासायचेच आहेत. त्यासोबत आतापर्यंत संघटनेकडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा उदा. पोलिओमुक्त देश, जागतिक साथीचे रोग इत्यादीचाही आढावा घ्यावा.

भारतामध्ये आरोग्य विषयक धोरणे, योजना आणि कार्यक्रम

अभ्यासक्रमातील योजनांबरोबरच आशा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, उषा, इंद्रधनुष्य अभियान सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेतकरी, गर्भवती अशा विशिष्ट गटांसाठीच्या आरोग्य विमा योजना, माता-बालकांच्या आरोग्य विषयीच्या विविध योजनांचा अभ्यास आवश्यक आहे.

स्वच्छ भारत योजना, महाराष्ट्रातील, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना, निर्मल ग्राम योजना इत्यादींचा आढावा घेणे आवश्यक आहे. या सर्व योजनांचा अभ्यास उद्देश, सुरुवात झाल्याचे वर्ष, उद्दीष्टे, लाभार्थी, त्यांचे निकष, लाभाचे स्वरूप व खर्चाची विभागणी अशा मुद्दय़ांच्या आधारे करायला हवा.

भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी

स्वच्छतेसंबंधीची सद्य:स्थिती तसेच बाल मृत्यू, माता मृत्यू, अर्भक मृत्यू अशी आरोग्यविषयक आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालामधून पाहता येईल. स्वच्छ सर्वेक्षणातील महाराष्ट्राची कामगिरी, ठळक मुद्दे माहीत असायला हवेत. महिला व बालकांचे आरोग्य व पोषणाबाबतचे विविध अहवाल व आकडेवारी समजून घ्यायला हवी.

ग्रामीण विकास

पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, ग्राम पंचायतीची विकासातील भूमिका
पायाभूत सुविधांचा व त्याबाबतच्या केंद्र- राज्याच्या योजनांची अंमलबजावणी यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका व्यवस्थित अभ्यासाला हवी. ७३ व्या व ७४ व्या घटना दुरुस्तीने ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आलेले विषय, जबाबदाऱ्या व कार्ये यांचा अभ्यास पेपर-२ च्या अभ्यासामध्ये झालेला असेलच. मात्र, या पेपरमध्ये या संस्थांकडे असलेल्या विकासात्मक बाबींचा विचार करायला हवा.

ग्रामविकासामध्ये सहकारी संस्थांची भूमिका

ग्रामीण विकासामध्ये वित्तीय व गैरवित्तीय सहकारी संस्था यांची भूमिका व्यवस्थित समजून घ्यायला हवी. या सर्व संस्थांची रचना, कार्ये, कार्यपद्धती व ग्रामीण जीवनावरील त्यांचा प्रभाव व परिणाम याबाबत विश्लेषण करणे आवश्यक आहे.

ग्रामविकासामध्ये अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था

सूक्ष्म वित्त ही संकल्पना समजून घेऊन ग्रामीण आर्थिक व्यवहारांमधील त्याचे महत्त्व, उपयोग, त्यातील आव्हाने, समस्या, कारणे उपाय व सूक्ष्म वित्त पद्धतीस प्रोत्साहन देणाऱ्या योजना अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

स्वयंसहाय्यता गट (SHG) ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यावी. याबाबत महिला आर्थिक महामंडळ व ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या कार्याचा आढावा घ्यायला हवा.

विविध प्रकारच्या वित्तीय संस्था, अग्रणी बँकेसारख्या योजना इत्यादींचे ग्रामीण विकासातील महत्त्व समजून घ्यावे. विशेषत: सहकारी वित्तीय संस्थांचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांबाबत व एकूणच आर्थिक चित्राबाबत पेपर-४ मधून पायाभूत व संकल्पनात्मक अभ्यास पूर्ण होईल मात्र ग्रामीण विकासामध्ये व कृषी विषयक कार्यामध्ये त्यांची भूमिका समजून घेऊन तिचे मूल्यमापन करणे पेपर-३ साठी महत्त्वाचे आहे.

जमीन सुधारणा व विकास

जमीन सुधारणेबाबतचे प्रयत्न, त्याबाबतचे नियम, कायदे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. जमीन सुधारणांच्या प्रयत्नांचे यश अपयश, परिणाम, त्यातून उद्भवलेले मुद्दे, याबाबतच्या कायदे, घटना दुरुस्त्या इत्यादींचा अभ्यास आवश्यक आहे. पेपर २ व पेपर ३ चा बराचसा भाग overlap होत असल्यामुळे त्यांचा

अभ्यास एकत्रीतपणे किंवा समांतरपणे केल्यास अभ्यासामध्ये सुसंगतता येईल आणि दोन्ही पेपरमधील विश्लेषणात्मक प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास मिळेल.

ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास

कुशल मनुष्यबळाचा आर्थिक विकासासाठी वापर करायचा तर पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असते, ही बाब लक्षात घ्यायला हवी. भारतातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. या दृष्टीने ग्रामीण क्षेत्रातील ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण व दळणवळण या अभ्यासक्रमातील मुद्दय़ांबरोबर पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता इत्यादी पायाभूत सुविधांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. या पायाभूत सुविधांचे स्वरूप, त्यांची गरज, संबंधित समस्या, परिणाम व उपाय अशा मुद्दय़ांच्या आधारे त्यांचा अभ्यास करायला हवा.

अभ्यासक्रमातील योजनांबरोबरच ढवफअ मॉडेल, स्मार्ट खेडे योजना, स्वच्छ भारत अभियान, सांसद आदर्श ग्राम योजना, आमदार आदर्श ग्राम योजना यांचाही अभ्यास इतर योजनांबरोबर करणे आवश्यक आहे. या योजनांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करावा: योजनेबाबतचा कायदा, पंचवार्षिक योजना, योजनेचे क्षेत्र, उद्देश, संख्यात्मक उद्दीष्ट, योजनेचे स्वरूप, असल्यास टप्पे, कालावधी, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष आणि लाभाचे स्वरूप, योजनेतून देण्यात येणाऱ्या किंवा अविकसित करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधेचे स्वरूप, अंलबजावणी यंत्रणा, नियंत्रक विभाग. खर्चाची विभागणी इ.

Story img Loader