रोहिणी शहा

गट क सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येत आहे. या घटकातील संकल्पनात्मक भागाच्या तयारीबाबत या लेखामध्ये पाहू.

India to remain fastest-growing large economy in FY26, FY27
भारताच्या आर्थिक भक्कमतेबाबत आशावाद; २०२५ मध्ये जागतिक अर्थस्थिती मात्र कमकुवत; प्रमुख जागतिक अर्थतज्ज्ञांच्या या सुसंकेतामागील कारण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा
devendra fadanvis
गतिमान प्रशासनासाठी मुख्यमंत्र्यांचे नियोजन,सरकारची सुधारित कार्यनियमावली; प्रशासकीय शिस्तीचा आग्रह

अर्थव्यवस्था विषयाच्या संकल्पना व संज्ञा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या विषयाच्या संकल्पना परस्परांशी घनिष्ठपणे संबंधित असतात. त्यामुळे तुलनात्मक (comparative) अभ्यासाने हा विषय सोपा होऊ शकतो. मूलभूत संकल्पना आणि व्याख्या समजणे या विषयाच्या तयारीसाठीची अट आहे. या तयारीसाठी  ठउएफळ ची १० वी १२ वी ची अर्थव्यवस्थेची पाठय़पुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे. घटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी व विकास :

राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, स्थूल मूल्यवर्धन, स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक या संकल्पना उदाहरणांसहित समजून घ्यायला हव्यात. या संकल्पनांचा तुलनात्मक अभ्यास करणे विषय समजून घेण्यासाठी जास्त फायद्याचे ठरते.

राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, त्यातील समस्या, व्यापारचक्रे यांचा कालानुक्रमे अभ्यास करणे व्यवहार्य ठरते. समस्यांचा कारणे, स्वरूप, परिणाम, उपाय अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

रोजगाराची संकल्पना समजून घेऊन तिचा भारतीय अर्थव्यवस्थेमधील संबंधित मुद्दय़ांबरोबरच अभ्यास करणे व्यवहार्य आहे. 

राष्ट्रीय उत्पन्न, ते मोजण्याच्या पद्धती, साधने, चलनवाढ आणि महागाईबाबतचे सिद्धांत, कारणे, परिणाम, उपाय यांचा अभ्यास  ठउएफळ पुस्तकांमधून करावा.

सार्वजनिक वित्त

बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची / आयव्ययाची भूमिका (बाजार अपयश व विकासानुकूलता)- सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू या संकल्पना समजून घेऊन त्यांचा परस्परसंबंध लक्षात घ्यावा. तुलनात्मक पद्धतीने या मुद्दय़ांचा अभ्यास करणे परिणामकारक ठरते.

सार्वजनिक वित्त घटकामध्ये अर्थसंकल्प हा मुद्दा मध्यवर्ती ठेवून संबंधित सर्व संकल्पना समजून घेतल्यास अवघड किंवा बोजड वाटणार नाहीत. अर्थसंकल्पाचे प्रकार, त्याच्या मंजुरीची प्रक्रिया, महसूल, महसुलाचे स्रोत- (केंद्रीय व राज्यस्तरीय) कर रचना कर सुधारणांचे समीक्षण – मूल्यवर्धित कर – वस्तू व सेवा कर या संकल्पना नीट समजून घ्यायला हव्यात.

अंदाजपत्रकीय, राजकोषीय, वित्तीय तुटी इत्यादी तुटीचे प्रकार, त्यांचे स्वरूप, त्यांची कारणे, परिणाम, उपाय या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. पण त्या बरोबरच याबाबतच्या चालू घडामोडी अथात याबाबतचे शासकीय तसेच  फइकचे निर्णय, आकडेवारी माहीत असायला हवी.

सार्वजनिक खर्चाचे (केंद्रीय व राज्यस्तरीय) प्रकार, यांतील घटक, त्यांचे प्रमाण, त्यांचे स्वरूप, त्यांच्या वृद्धीची कारणे, परिणाम, समस्या, उपाय, सार्वजनिक खर्च सुधारणेसाठीचे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. 

सार्वजनिक कर्जाचे प्रकार यांतील घटक, त्यांचे प्रमाण, त्यांचे स्वरूप, त्यांच्या वृद्धीची कारणे, परिणाम, समस्या, उपाय असे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

भारतातील वित आयोग, राज्यांच्या केंद्राकडून असलेल्या समस्या, भारतातील वित्तीय सुधारणा हे मुद्दे पारंपरिक आणि गतिमान अशा दोन्ही बाजूंनी महत्त्वाचे आहेत. त्यांचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. मूलभूत मुद्दे समजून घेऊन याबाबतच्या चालू घडामोडींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. 

सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था या उपघटकाचा अभ्यास त्यामध्ये नमूद प्रत्येक मुद्दा मूलभूतपणे समजून घेऊन करणे आवश्यक आहे. याबाबत संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तसेच हा भाग नियमितपणे अपडेत करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक पाहणी अहवालामध्ये याबाबत होणारी चर्चा, नवे मुद्दे, संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल:

वृद्धीचे इंजिन स्वरूपात आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अर्थव्यवस्थेतील वृद्धीमधील महत्त्व/ योगदान आणि वृद्धीतील परकीय भांडवल व तंत्रज्ञानाची भूमिका अशा अर्थाने अभ्यासावा.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अभिजात व आधुनिक सिद्धांत हे सिद्धांत तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काढून उदाहरणांच्या आधारे अभ्यासले तर समजणे व लक्षात ठेवणे सोपे होईल. 

आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था आणि क्षेत्रीय व्यापार करार यांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करावा : स्थापनेमागील हेतू, उद्दिष्टे, स्थापनेचे वर्ष, भारत सदस्य आहे का? असल्यास भारताची यांमधील भूमिका, त्यांचे आंतरराष्ट्रीय व भारतासाठीचे योगदान

जागतिक व्यापार संघटनेची आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणुकीमधील भूमिका, तिचे नियम, याबाबत उद्भवणारे मुद्दे, व चालू घडामोडी पहायला हव्यात. या अनुषंगानेच व्यापारविषयक बौद्धिक संपदा आणि व्यापारविषयक गुंतवणूक उपाय हे मुद्दे अभ्यासावेत.

Story img Loader