महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक पूर्ण झाली आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे या मुद्द्यावर पारंपरिक आणि तथ्यात्मक अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत. काही सराव प्रश्न मागील लेखात आपण पाहिले. या लेखामध्ये आणखीन काही प्रश्न पाहू.

प्रश्न १. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे?

Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
SBI Clerk Recruitment 2024 Notification 2024 released for recruitment of Junior Associates at sbi.co.in
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती; इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज; अर्जाची लिंक बातमीत
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये
Donald Trump's Diwali message to Hindu Americans
Donald Trump on Diwali: अमेरिकेतील हिंदूंनी भोगलेला धर्मद्वेषाचा इतिहास काय सांगतो?
election decision officer car fire, Disabled independent candidate,
दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली
Amit Thackeray Code of Conduct
Shivsena UBT Letter : मनसेविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, दीपोत्सवावरून थेट निवडणूक आयोगाला पत्र; अमित ठाकरे अडचणीत येणार?
Raj Thackeray kalyan Rural
Raj Thackeray Speech : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा

१) मुंबई राज्याचे तेंव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.

२) देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमी वयात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होणारे नेते आहेत.

३) वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळाकरीता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होते.

४) महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद सर्वाधिक वेळा काँग्रेस पक्षाकडे गेले आहे.

प्रश्न २. विधानमंडळाच्या सदस्यत्वासाठी पात्रतेचे निकष पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विहीत करण्यात आले आहेत?

१) भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७३

२) लोक प्रतिनिधित्व कायदा, १९५० कलम ५

३) लोक प्रतिनिधित्व कायदा, १९५० कलम ६

४) वरील सर्व

प्रश्न ३. पुढीलपैकी कोणत्या निवडणुकांमध्ये नोटा पर्याय उपलब्ध असतो?

अ. ग्रामपचायत राज्यसभा

ब. विधानसभा

क. विधानपरिषद

ड. लोकसभा

इ.

पर्याय:

१) अ, ब आणि क

२) अ, ब आणि ड

३) ब, क आणि ड

४) वरील सर्व

प्रश्न ४. राज्य मंत्रिमंडळात अनुज्ञेय सदस्यांची कमाल संख्या किती आहे?

१) राज्य विधान परिषद सदस्यसंख्येच्या १०

२) राज्य विधानमंडळ सदस्यसंख्येच्या १०

३) राज्य विधान परिषद सदस्यसंख्येच्या १५

४) राज्य विधानसभा सदस्यसंख्येच्या १५

प्रश्न ५. राज्य विधानसभेच्या सभापतींच्या अधिकाराबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

१) ते सभागृहाची सुव्यवस्था आणि शिष्टाचार राखतात.

२) एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे ते ठरवतात.

३) एखाद्या विधेयकावरून दोन्ही सभागृहांमधील गतिरोध दूर करण्यासाठी विधानसभा आणि परिषदेचे संयुक्त अधिवेशन बोलावतात.

४) गणपूर्ती अभावी ते सभा तहकूब करतात किंवा सभा निलंबित करतात.

प्रश्न ६. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबतच्या तरतुदी व वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.

पर्याय

१) अ-४, ब-१, क-२, ड-३

२) अ-२, ब-१, क-३, ड-४

३) अ-३, ब-४, क-१, ड-२

४) अ-१, ब-२, क-३, ड-४

उत्तरे व संबंधित मुद्दे

प्रश्न १. (२)

शरद पवार हे सर्वात कमी वयात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होणारे नेते आहेत.

यशवंतराव चव्हाण हे सन १९५६ पासून मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्य पुनर्रचनेनंतर राज्य विधानसभेची निवडणूक सन १९६२ मध्ये झाली. सन १९६० ते १९६२ या कालावधीत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले. निवडणुकीनंतर मारोतराव कन्नमवार हे राज्याचे मुख्यमंत्री बनले.

प्रश्न २. (४)

१. राज्यघटनेच्या अनुच्छेद १७३ मध्ये विधानसभा आणि विधान परिषद सदस्यत्वासाठी पात्रतेचे पुढील निकष विहीत करण्यात आले आहेत.

भारताचे नागरिकत्व.

विधानसभेसाठी वयाची २५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

विधान परिषदेसाठी वयाची ३० वर्षे पूर्ण केलेली असावीत.

संसदेने केलेल्या कायद्यानुसार विहीत केलेल्या इतर अर्हता.

२. राज्यघटनेच्या अनुच्छेद १९१ मध्ये विधानसभा आणि विधान परिषद सदस्यत्वासाठी अपात्रतेचे पुढील निकष विहीत करण्यात आले आहेत. लाभाचे पद धारण करणे मनोविकलता अविमुक्त नादारी

नागरिकत्वाचा त्याग

३. लोक प्रतिनिधित्व कायदा, १९५० कलम ५ अन्वये राज्य विधानसभेच्या तर कलम ६ अन्वये विधान परिषदेकरिता पात्रता विहीत करण्यात आल्या आहेत.

४. लोक प्रतिनिधित्व कायदा, १९५० कलम ८ ते ११ अ मध्ये सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी अपात्रतेचे निकष विहीत करण्यात आले आहेत.

प्रश्न ३. (२)

अप्रत्यक्ष निवडणुकांमध्ये वरीलपैकी नाही हा पर्याय असू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१८ मध्ये दिल्यानंतर विधानपरिषद व राज्यसभा निवडणुकांमध्ये हा पर्याय रद्द करण्यात आला आहे.

प्रश्न ४. (४)

सन २००३ मध्ये ‘राज्याच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या राज्य विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या १५ पेक्षा जास्त नसावी’. अशी तरतूद ९१ व्या घटनादुरुस्तीनुसार अनुच्छेद १६४ मध्ये खंड १अ समाविष्ट करून करण्यात आली आहे.

प्रश्न ५. (३)

राज्यघटनेच्या अनुच्छेद १७६ अन्वये राज्यपाल प्रत्येक सार्वजनिक निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये, आणि प्रत्येक वर्षीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांची संयुक्त अधिवेशन बोलावून विशेष अभिभाषण करतात. एखाद्या विधेयकावर राज्य विधान मंडळाच्या सभागृहांमधील मतभेदाच्या परिस्थितीत संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तरतूद घटनेमध्ये नाही.

प्रश्न ६. (१)

१) अ-४, ब-१, क-२, ड-३

Story img Loader