राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या भाषा विषयांच्या तयारीबाबतची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर तीन म्हणजे सामान्य अध्ययन पेपर एक मधील भूगोल घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येत आहे. यातील प्राकृतिक घटकाबाबत या लेखामध्ये पाहू.

भूरूपशास्त्र

प्राकृतिक भूगोलामधील संकल्पना व मुद्दे हे भूरूप निर्मितीशी संबंधित घटक म्हणून अभ्यासणे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे या घटकांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ तयारी करताना जास्त महत्त्व देऊन अभ्यासावी लागणार आहेच. पण त्यांचा मूलभूत अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. या घटाकांचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास झाल्याशिवाय त्यांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ समजून घेता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.

maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
tiger reserve project
विश्लेषण : सरकारला व्याघ्रप्रकल्प नको आहेत का?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Ladki Bahin Yojana application scrutiny Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही? आदिती तटकरे महत्त्वाची माहिती देत म्हणाल्या…
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
Pune crowded Lakshmi road, Lakshmi road pune,
विश्लेषण : पुण्यातील गजबजलेला लक्ष्मी रस्ता होणार वाहनमुक्त! कर्कश हॉर्न, बेशिस्त पार्किंग, बेदरकार वाहनचालकांना चाप… कसा? कधी?

पृथ्वीचे अंतरंग- रचना आणि घटना -अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे हे मुद्दे भूमी स्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक म्हणून अभ्यासायचे आहेत. पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना तिच्या अंतर्भागाची रासायनिक व भौतिक रचना, त्यांची वैशिष्ट्ये, वितरण आणि त्यामुळे तयार होणाऱ्या अंतर्गत शक्ती असे मुद्दे यामध्ये पहायला हवेत. खडक, खनिजे यांचा परिणामही व्यवस्थितपणे समजून घ्यायला हवा.

या व्यतिरिक्त भूमी स्वरूपांच्या विकासावर ज्या घटकांचा परिणाम होतो, ज्यांची महत्त्वाची भूमिका असते त्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ स्त्रोताचा उठाव/ उंची, खडकांची भौगोलिक रचना, हवामान, ऊर्जा, जैविक क्रिया आणि मानवी क्रिया यांचा समावेश होतो. या घटकांचा भूरूप निर्मितीवरील परिणाम समजून घ्यायला हवा.

हेही वाचा : मुलाखतीदरम्यान ‘या’ चार चुका कधीही करू नका; जाणून घ्या, त्या गोष्टी कोणत्या?

भूरूपचक्रांची संकल्पना हा मुद्दा बहिर्गत शतींचे कार्य या घटकांतर्गत येईल. यामध्ये नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमी स्वरुपे अभ्यासायची आहेत. या कारक घटकांच्या विदरण आणि संचयनाच्या कार्यातून विकसित होणारी भूरूपे आणि त्यामध्ये समाविष्ट भूरूपकीय प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास भूरूपांच्या आकृत्यांसह टेबलमध्ये नोट्स काढाव्या. त्यामुळे आकृत्यांचा प्रश्न व्यवस्थित सोडवता येईल.

भारतीय उपखंडाची उत्क्रांती कशी झाली याचा भूरूपशात्रीय मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग- हिमालयीन प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, वाळावंट, किनारी प्रदेश व बेटे यांचे स्वरुप, विस्तार, रचना, वैशिष्ट्ये, भौगोलिक व हवामानशास्त्रीय महत्त्व, आर्थिक महत्त्व हे पैलू अभ्यासायला हवेत. यामधील नदीप्रणाली व पर्वतप्रणालींचा अभ्यास दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम अशा क्रमाने केल्यास परिणामकारक ठरेल.

महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपकीय वैशिष्ट्ये अभ्यासताना नदी व पर्वत प्रणालींचा उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने सलगता लक्षात घेऊन अभ्यास करावा. या ठळक भूरूपांनंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृष्ये/ भूमीस्वरुपे झ्र टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण यांचा आढावा घ्यावा. यामध्ये अशा भूरूपांचे स्थान, वैशिष्ट्ये, भौगोलिक तसेच पर्यटनातील महत्त्व असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

हवामानशास्त्र

वातावरण – वातावरणाची संरचना, घटना व विस्तार अभ्यासताना त्याचे ऋतू व हवामानावरील परिणाम समजून घ्यायला हवेत.

हवा व हवामानाची अंगे (Elements of weather and climate) अभ्यासताना तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वायुदाब, वारे हे महत्त्वाचे घटक व त्यांचा हवामानावरील परिणाम यांतील संकल्पनात्मक भाग महत्त्वाचा आहे. कार्यकारण संबंध जोडून या संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

सौर ऊर्जा- पृथ्वीपृष्ठारील उष्णतेचे संतुलन, तापमान- पृथ्वीपृष्ठारील तापमानाचे ऊर्ध्व व क्षितिजसमांतर वितरण या मुद्द्यांचा अभ्यास उष्णतेच्या संतुलनावर परिणाम करणारे घटक, संतुलनाचा परिणाम, तापमानाच्या वितरणास कारक घटक व त्याचा परिणाम समजून घेऊन करावा.

हवेचा दाब, वारे, ग्रहीय व स्थानिक वारे यांचे कारक घटक व परिणाम समजून घ्यावेत.

हेही वाचा : NABARD Recruitment 2024: असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र झाले जारी; डाउनलोड करण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो

मोसमी वारे(मान्सून), पर्जन्याचे वितरण, अवर्षण व पूर व त्यांच्याशी निगडीत समस्या यांचा महाराष्ट्रापुरता भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असला तरी भारतीय पर्जन्याचा आढावा घेणे या मुद्द्यांच्या आकलनासाठी आवश्यक आहे.

मान्सूनची निर्मिती, ऋतूंची निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. वेगवेगळ्या घटाकांमध्ये समाविष्ट भौगोलिक प्रक्रियांच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत –

भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी ; घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)

Story img Loader