रोहिणी शहा

गट क सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील भूगोल या उपघटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत करण्यात आला आहे :

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

महाराष्ट्राच्या संदर्भात भूगोलाचा दोन प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. एक भाग पूर्णपणे महाराष्ट्राच्या भूगोलाचा आहे आणि दुसरा भाग भारताच्या भूगोलातील एकक म्हणून महाराष्ट्राचा अभ्यासायचा आहे. पहिल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या आदिम जमाती, खनिज संपत्ती, भौगोलिक विभाग, आर्थिक भूगोल, लोकसंख्येचे पैलू, कृषी हवामान विभाग, नदीप्रणाली इ. चा अभ्यास ठेवायचा आहे. दुसऱ्या भागामध्ये भौगोलिक, प्राकृतिक, आर्थिक, लोकसंख्या इ. बाबींचा संपूर्ण भारतातील या वैशिष्ट्यांशी संबंधित एक घटक म्हणून आणि इतर घटकांशी तुलना करून विश्लेषणात्मक असा अभ्यास अपेक्षित आहे.

प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल अशी या घटकाची व्याप्ती आहे. या लेखामध्ये संकल्पनात्मक आणि प्राकृतिक भूगोलाच्या तयारीबाबत पाहू.

संकल्पनात्मक भूगोल

संकल्पनात्मक भूगोल हा प्राकृतिक भूगोलाचाच एक घटक आहे. भूगोलाच्या पायाभूत महत्त्वाच्या संकल्पना वैज्ञानिक आहेत. आणि त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

जगाच्या भूगोलाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश नसला तरी जगातील हवामान विभाग व त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये समजून घ्यावीत. व भारतामध्ये असणारे हवामान विभाग व त्यांची वैशिष्ट्ये समजून घ्यावीत.

मान्सूनची निर्मिती, वित्तरण, भारताच्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही भौगोलिक घटना / प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत. भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी; घटना घडू शकते / घडते ती भौगोलिक ठिकाणे प्रत्यक्ष घटना / प्रक्रियेचे स्वरूप : घटनेचे प्रक्रियेचे परिणाम, पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर / प्रक्रियेवर होणारे परिणाम, असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना / प्रक्रिया (current events)

नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्द्यांच्या वा टेबलच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. यामध्ये प्रत्येक कारकासाठी खनन/ अपक्षरण आणि संचयन कार्यामुळे होणारी भूरूपे, त्यांचे आकार, वैशिष्ट्ये, असल्यास आर्थिक महत्त्व, प्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण असे मुद्दे लक्षात घ्यावेत. या मुद्द्याच्या आधारे तुलनात्मक टेबल करता आल्यास लक्षात राहणे सोपे जाईल.

प्राकृतिक भूगोल

यामध्ये नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ. बाबत प्रामुख्याने विचारले जाऊ शकतात. नकाशावर आधारित, बहुविधानी किंवा जोड्या लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्नही विचारले जाऊ शकतात. हा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा.

भारतातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादी मधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी.

भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

भारतातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादी मधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी. भारतातील महत्त्वाचे हवामान विभाग, मृदा आणि वनांचे प्रकार यांचा नकाशा समोर ठेवून आढावा घ्यावा. महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्ट्ये, हवामानाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्ट्यांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल