रोहिणी शहा

कृषी विषयाच्या सामान्य अध्ययन पेपर एकमधील परिसंस्था आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्दय़ांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. Agro ecology या शब्दाचे कृषी परिसंस्था असे भाषांतर मराठी अभ्यासक्रमामध्ये असले तरी प्रत्यक्षात कृषी पारिस्थितिकी अशी कृषी विज्ञानातील शाखा अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यायला हवे. पर्यावरण विषयातील मूलभूत मुद्दय़ांच्या आधारे शेती कशा प्रकारे करता येईल हा या शाखेचा अभ्यासविषय आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आधी पर्यावरण विषयातील मूलभूत संकल्पना समजून घेऊन मग त्यांचा कृषी घटकाच्या संदर्भातअभ्यास करणे ही strategy असणे आवश्यक आहे.

Mumbai , Green area, sea coast , greenery,
सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
Loksatta explained Why insist on the post of Guardian Minister of a specific district
विश्लेषण : पालकमंत्रीपदासाठी एवढा अट्टहास का ?
Ujani dam, desilt Ujani dam, Radhakrishna Vikhe Patil,
उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानंतर, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण
neet ug exam supreme court
शिफारशींची नीट अंमलबजावणी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

परिसंस्थेची संकल्पना समजून घेताना त्यातील जैविक आणि अजैविक घटक, त्यांचे परिसंस्थेतील कार्य (उदा. उत्पादक/ भक्षक/ विघटक) समजून घ्यावे. परिसंस्थेची रचना अभ्यासताना वेगवेगळे घटक कोणत्या स्तरावर येतात व त्यांची त्यात्या स्तरावरील भूमिका/ उपयोग/ आवश्यकता काय आहे हे समजून घ्यावे. या आधारे ऊर्जा प्रवाह समजून घेणे सोपे होते. परीसंस्थेचे एक घटक म्हणून कार्य, निसर्गातील महत्त्व, तिच्या संवर्धनाची आवश्यकता, तिचे मानवासाठी महत्त्व हे विश्लेषणात्मक मुद्दे आहेत. त्यांचा याच क्रमाने अभ्यास केला तर बहुविधानी प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरते.

जमिनीवरील (terrestrial) परिसंस्थांमध्ये वेगवेगळय़ा हवामान प्रदेशात वेगवेगळय़ा परिसंस्था असतात. त्या त्या परिसंस्थेतील मृदेचा प्रकार, हवामान, वनस्पतींचे प्रकार आणि प्राण्यांचे प्रकार हे तिचे विशिष्ट गुणधर्म असतात. जंगल, गवताळ प्रदेश, टुंड्रा आणि वाळवंट या परिसंस्थांचे प्रकार पुढील मुद्दय़ांच्या आधारे तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यासल्यास फायदेशीर ठरते. त्या त्या परिसंस्थेतील हवामानाची वैशिष्टय़े, आढळणाऱ्या मृदांचे प्रकार, या दोन्हींनुसार वनस्पती आणि प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन इत्यादी पाण्यातील परिसंस्थांचे गोडय़ा पाण्यातील व समुद्री पाण्यातील असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल

पाण्याचा प्रकार (वाहते/ साठलेले) किंवा स्थान (खोल समुद्र / किनारी प्रदेश), पाण्यातील क्षार/ मीठाचे प्रमाण, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये पाण्याच्या क्षारता व खोलीनुसार झालेले अनुकूलन परिसंस्थेतील उर्जा प्रवाह अभ्यासताना अजैविक घटकांपासून जैविक उत्पादक घटकांपर्यंत व त्यानंतर अन्न जाळय़ामध्ये व विघटनानंतर पुन्हा अजैविक घटकांपर्यंत असे ऊर्जेचे वहन नीट समजून घ्यायला हवे. त्यासाठी अन्न साखळी व अन्न जाळे या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. प्रत्येक टप्प्यावरील ऊर्जेचा किती भाग पुढील टप्प्यामध्ये जातो हे समजून घेणेही आवश्यक आहे. जैवविविधता ही संकल्पना समजून घेताना त्यातील महत्वाचे घटक, त्यांचे महत्त्व, जैवविविधतेच्या संवर्धनाची आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनाची आवश्यकता हे मुद्दे पहायला हवेत. जैवविविधतेस असलेले धोके, त्यामागील कारणे, तिच्या नाशाचे परिणाम, जैवविविधता संवर्धन करण्यासाठीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न, त्यामध्ये कार्यरत संस्था/ संघटनांची रचना, कार्ये, यश हे मुद्दे अभ्यासणे आवश्यक आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रकार, त्यांचा वापर, महत्त्व, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता या बाबी उदाहरणांसहित समजून घ्याव्यात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका/ जबाबदारी हा विश्लेषणात्मक मुद्दा हे. याबाबतचे मुद्दे विविध स्त्रोतांतून अभ्यासायला हवेत. तसेच या क्षेत्रातील नवनवीन उपक्रमही माहीत करून घ्यायला हवेत. पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी या परस्परसंबंधित आहेत हे लक्षात घ्यायला हवे. यामध्येच आर्थिक पैलूही लक्षात घेणे आवश्यक आहे. शेतीतील प्रक्रिया (उदा. सिंचन आणि) परिसंस्था किंवा एकूणच पर्यावरण यांचा एकमेकांवर होणारा परिणाम व्यवस्थित समजून घ्यायला हवा. अन्न सुरक्षा, उपजीविका इत्यादी सामाजिक आर्थिक घटक आणि पिक उत्पादन यांमधील परस्परसंबंध बारकाईने अभ्यासायला हवेत.

कार्बन क्रेडिट ही संकल्पना अभ्यासताना कार्बन उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन करण्यासाठी अनुज्ञेय मर्यादा (कार्बन क्रेडिट), त्यांच्या मर्यादेबाहेर कार्बन उत्सर्जन करण्यासाठी कार्बन क्रेडिट्सची देवाण घेवाण हे मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. याबाबतच्या IPCCC मधील ठराव आणि निर्णय तसेच चालू घडामोडींची माहिती असायला हवी. कार्बन उत्सर्जन शोषून घेण्याच्या कार्बन जप्ती (Sequestration) या संकल्पनेचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा. कार्बन शोषून घेणारी माध्यमे व त्यामागील प्रक्रिया समजून घ्याव्यात. कार्बन जप्तीचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व समजून घ्यायला हवे. त्यासाठीचे उपाय/ मार्ग माहीत करून घ्यावेत.

पर्यावरणीय नितीतत्वे ही पर्यावरण संवर्धन व सुरक्षेतील मानवाची भूमिका व जबाबदारी अशा दृष्टिकोनातून अभ्यासायची आहेत. वेगवेगळय़ा क्षेत्रातील पर्यावरणीय समस्यांबाबत पर्यावरणीय नितीतत्वे उदाहरणांच्या माध्यमातून समजून घ्यायला हवी. कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्ल वर्षां, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश (होलोकॉस्ट) परिणाम अभ्यासताना या सर्व मुद्दय़ांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांचे स्त्रोत, या समस्या कमी करण्यासाठीचे उपाय, करण्यात येणारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न असे मुद्दे पहावेत.

Story img Loader