फारूक नाईकवाडे

मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमधील विज्ञान व तंत्रज्ञान घटकातील उर्वरित घटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

Entrance Exam JEE Mains Exam for Engineering Architecture career news
प्रवेशाची पायरी: इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी जेईई मेन्स परीक्षा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
Loksatta sanvidhanbhan Powers of inquiry and suggestions to the Commission for Scheduled Castes and Tribes under Article 338
संविधानभान: मारुती कांबळेचं काय झालं?
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
Indian economy current affairs
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्था चालू घडामोडी

जैवतंत्रज्ञान

मूलभूत मुद्दे

जैवतंत्रज्ञान, अति सूक्ष्मतंत्रज्ञान, जनुक फुटन, पुनसयंत्रक डीएनए तंत्रज्ञान यांमधील मूलभूत वैज्ञानिक तत्त्वे समजून घ्यावीत. त्यांचे थोडक्यात स्वरूप, उपयोजन यांचा आढावा घ्यावा.

शेतीमध्ये जैवतंत्रज्ञान

शेतीमध्ये जैवतंत्रज्ञान कसे आणि केव्हापासून वापरले जाते याबाबतचे ठळक टप्पे माहीत करून घ्यावेत. जैविक कीटकनाशक, खते, जैवइंधन यांचा त्यांचे मूलभूत घटक, स्वरूप, वापर, महत्त्व, समस्या, कारणे व उपाय या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा.

पर्यावरणविषयक स्वच्छता, जैविक उपचार, जैवविविधतेचे संवर्धन या मुद्द्यांमागील तत्त्वे समजून घ्यावीत. त्यांचे महत्त्व, आवश्यकता, त्यासाठीचे शासकीय उपक्रम किंवा चर्चेत असलेले प्रयत्न यांचा आढावा घ्यावा.

वनस्पती ऊर्जा संवर्धन आणि प्रतिरक्षा विज्ञान

यांमध्ये नमूद मूलभूत वैज्ञानिक तत्वे व नेमके तंत्रज्ञान समजून घ्यावे. या तंत्रज्ञानाच्या आधारे बनविलेली विविध यंत्रे, तंत्रे आणि साधने, त्याचे उपयोजन यांची माहिती करून घ्यावी.

डीएनए तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरिता उपयोगिता

या उपघटकामध्ये समाविष्ट सर्व मुद्द्यांमागील मूलभूत विज्ञान, त्यांचे स्वरूप, त्यांचा वापर, महत्त्व, आवश्यकता आणि त्यांमधील समस्या, कारणे व उपाय असे घटक अभ्यासायला हवेत.

लसी

परंपरागत व आधुनिक पद्धतीच्या लसींचे प्रकार, त्यांतील मूलभूत घटक, त्यांच्याशी संबंधित रोग, संबंधित रोगांचे कारक, रोगामुळे होणारे परिणाम, लसीच्या शोधाचा थोडक्यात आढावा, लसीकरणासाठी आवश्यक वयोगट अशा मुद्द्यांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आणि त्यातील घटक लसी, शासनाचे लसींबाबतचे धोरण, लसीकरण कार्यक्रमाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या लसी यांचाही अभ्यास आवश्यक आहे.

किण्वन

औद्याोगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण किण्वन उत्पादने अभ्यासताना किण्वनाचा कारक घटक, त्याचा संबंधित उद्याोगातील वापर व महत्त्व यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करावा.

किण्वन प्रक्रिया, त्यामागील वैज्ञानिक तत्त्व आणि तिचे दैनंदिन जीवनातील उपयोजन हेही मुद्दे अभ्यासायला हवेत.

जैवनैतिकता

आरोग्य सेवेत जैवनैतिकता या मुद्द्यामध्ये समाविष्ट सर्व मुद्दे मूलभूत तंत्रज्ञान व उपयोजन या दृष्टीने बारकाईने अभ्यासावेत.

कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान, जन्मपूर्व निदान या प्रक्रियांमधील विज्ञान समजून घ्यावे. या प्रक्रियांबाबतचे कायदे व त्यातील अद्यायावत बदल यांचा अभ्यास आवश्यक आहे.

जनुकीय चाचणी, आनुवंशिक तपासणी, जनुकीय उपचार पद्धती, प्रत्यारोपण तंत्रज्ञान यांचा अभ्यास त्यांमागील विज्ञान, थोडक्यात प्रक्रिया समजून घेणे, त्यांचा वापर आणि गैरवापर, त्यांचे महत्त्व, याबाबतची शासकीय धोरणे किंवा मार्गदर्शक तत्त्वे या मुद्द्यांच्या आधारे करावा.

जैवसुरक्षा

ही संकल्पना समजून घेऊन जैवसुरक्षेचे ४ टप्पे आणि त्यांच्याशी संबंधित धोक्यांची पातळी, संबंधित रोगजंतू/जीव, समाविष्ट प्रक्रिया, रसायने असे टेबल तयार करून अभ्यास करता येईल. याबाबतची जैवतंत्रज्ञान विभागाची मार्गदर्शक तत्त्वे मूळ दस्तावेज पाहून अभ्यासावीत.

एकाधिकार (पेटंट)

बौद्धिक मालमत्ता अधिकार ही संकल्पना आणि त्यातील विविध प्रकार समजून घेणे आवश्यक आहे.

पेटंटिंग प्रक्रिया, पेटंट कायद्यामधील प्रक्रिया आणि उत्पादन या बाबींशी संबंधित तरतुदी समजून घ्याव्यात.

याबाबत जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO), तिचे कार्य व अधिकार आणि वाटचाल यांचाही अभ्यास आवश्यक आहे.

भारताचे आण्विक कार्यक्रम

अभ्यासताना त्यांची भारतासाठी आवश्यकता समजून घेतल्यास आपोआपच त्याची वैशिष्ट्येही समजतात. भारताच्या सर्वच आण्विक चाचण्या त्यांची वैशिष्ट्ये, समाविष्ट प्रक्रिया अशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यासाव्यात. अलीकडील आण्विक धोरणे अभ्यासताना त्यांतील भारताची भूमिका, उद्दिष्टे आणि ठळक तरतुदी समजून घ्याव्यात.

आण्विक तंत्रज्ञानाच्या बेसिक संकल्पनांवरही प्रश्न विचारण्यात येतात. आण्विक औष्णिक वीजनिर्मिती मुद्द्यासाठी वैज्ञानिक तत्त्व, अणुभट्ट्यांची थोडक्यात रचना, कच्चा माल, रिअॅक्टरचा प्रकार, कार्य आणि आण्विक कचरा, अपघात यांसारखे पर्यावरणीय मुद्दे अभ्यासणे आवश्यक आहे.

शेतीपासून वैद्याकीय क्षेत्रापर्यंतचे आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग उदारहणांच्या आधारे समजून घ्यावेत.

CTBT, NSG यांबाबतची भारताची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.

आपत्ती व्यवस्थापन

या घटकाच्या मूलभूत आयामांमध्ये आपत्तींची व्याख्या, त्यांचे वर्गीकरण, आपत्ती व्यवस्थापनामध्ये समाविष्ट मुद्दे या बाबी समाविष्ट होतात.

आपत्तींचे स्वरूप, कारक घटक या मुद्द्यांच्या आधारावर आपत्तीचे वर्गीकरण हा मुद्दा टेबलमध्ये नोट्स काढून तयार करावा.

नैसर्गिक आपत्ती, मानवी आपत्ती यांची कारणे, परिणाम व उपाययोजना अशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा.

दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया

यांमागे सामाजिक, आर्थिक व राजकीय पैलू जास्त प्रभावी असतात हे समजून घेणे आवश्यक आहे. ही सर्वसाधारण कारणे लक्षात घ्यावीत.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठळक दहशतवादी कारवायांमागील कारणे, त्यांचे परिणाम व त्यांच्या निर्मूलनासाठीचे प्रयत्न या बाबी बारकाईने समजून घ्यायला हव्यात. याबाबतच्या चालू घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवायला हवे.

अपघात

अपघातांचे अभ्यासक्रमात उल्लेख केलेले तसेच अन्य प्रकार समजून घ्यावेत. त्यांमागची कारणे व त्यावरील संभाव्य उपाययोजना अभ्यासाव्यात.

बांधकाम अंकेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) ही संकल्पना समजून घेऊन तिची आवश्यकता तसेच त्याबाबतचे नियम लक्षात घ्यावेत. यासाठीच्या प्राधिकरणांची गरज समजून घ्यावी. जेव्हा अशी प्राधिकरणे स्थापन होतील त्या वेळी त्यांची रचना, कार्ये, अधिकार, कार्यपद्धत असे मुद्दे अभ्यासायला हवेत.

आपत्ती पूर्वानुमान व मदतकार्य

! आपत्तींची ओळख / पूर्वकल्पना यासाठीची भारतातील यंत्रणा, संस्था, उपग्रह यांचा आढावा घ्यायला हवा. आपत्तींचे प्रभावक्षेत्र व धोके यांचे विश्लेषण अभ्यासताना त्यांचे प्रादेशिक वितरण, तीव्रता, परिणाम, उपाय या मुद्द्यांचा विचार करावा.

त्र मदतकार्य व पुनर्वसन कार्याची तत्त्वे त्यासाठीची ठळक उदाहरणे लक्षात घेऊन अभ्यासावीत. आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५च्या तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांची रचना, कार्ये, जबाबदाऱ्या, अधिकार आणि कार्यपद्धती समजून घ्यावी.

बहुविधानी, विश्लेषणात्मक प्रश्नांच्या तयारीसाठी अभ्यासक्रमातील सर्व मुद्द्यांमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक उपमुद्द्याचा अभ्यास, चालू घडामोडींची अद्यायावत माहिती आणि व्यावहारिक विचार महत्त्वाचा आहे.