रोहिणी शहा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनचे स्वरूप आणि त्यातील सामान्य विज्ञान घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमध्ये २०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात येतात. हा पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा आहे आणि यातील प्रश्न हे केवळ इंग्रजी भाषेतूनच विचारण्यात येतात. इतर परीक्षांप्रमाणे हा पेपर bilingual नाही. त्यामुळे या पेपरची प्रत्यक्ष तयारी ही इंग्रजी माध्यमातूनच करायची आहे, हे लक्षात घ्यावे.
वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमधील विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे:
General Science ( Physics, Chemistry, Botany, Zoology या अभ्यासक्रमावर मागील वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे. या विश्लेषणातील मुद्यांच्या आधारे अभ्यासाची नेमकी दिशा ठरविण्यास मदत होते. या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करणे व्यवहार्य ठरते:
या घटकावर दरवर्षी साधारणपणे १३ ते १५ प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्नांमध्ये विचारलेले मुद्दे हे नेमकी माहिती असेल आणि मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तरच सोडविता येतील अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे मूलभूत संकल्पना व वर्गीकरणातील नेमकी तथ्ये यांचा पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे.
रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाच्या संयुगांची रेणूसूत्रे, गुणधर्म, उपयोग यांवर भर दिलेला दिसून येतो मात्र तरीही पुढील मुद्यांचा अभ्यास आवश्यक आहे – मूलद्रव्यांचे वर्गीकरण, आवर्तसारणी, महत्त्वाच्या मूलद्रव्यांची वैशिष्टय़े, उपयोग, अणूंची रचना, कार्बनी व अकार्बनी रसायनशास्त्र, कार्बनी संयुगांमधील बंधांचे स्वरूप, महत्त्वाचे सिद्धांत, महत्त्वाच्या कार्बनी व अकार्बनी संयुगांची रेणूसूत्रे, वैशिष्टय़े, उपयोग, महत्त्वाच्या अभिक्रिया इत्यादीसारख्या मूलभूत बाबींची व्यवस्थित उजळणी करायला हवी.
भौतिकशास्त्रातील महत्त्वाचे सिद्धांत, मूलभूत संकल्पना, बल, विद्युत इत्यादींवरील समीकरणे यांचा प्रश्नांमध्ये समावेश असल्याचे दिसते. या घटकावर साधे सोपे (Straight forward) प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी आहे मात्र मूलभूत अभ्यास झाला असेल तर आत्मविश्वासाने हे प्रश्न सोडविता येतात. वस्तुमान, बल, दाब, गती, ऊर्जा, विद्युत, प्रकाश, चुंबकत्व या मुख्य घटकांचा अभ्यास महत्त्वाचे सिद्धांत, महत्त्वाची समीकरणे, संबंधित राशीचे एकक, गणना, वैशिष्टय़े, स्त्रोत, परिणाम, उपयोग अशा मुद्दय़ांच्या आधारे करायला हवा.
वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्रातील काही मुद्दे हे अभ्यासक्रमातील मुद्दा क्रमांक २.४ आणि २.५ च्या तयारीमध्येही उपयोगी पडतात. त्यामुळे या घटकांचा एकत्रित अभ्यास केल्यास वेळही वाचेल आणि सलग अभ्यास केल्यामुळे समजून घेणे सोपे होईल.
वनस्पती व प्राणीशास्त्रातील वर्गीकरण, विविध वर्गातील वनस्पती/ प्राण्यांची वैशिष्टय़े, वनस्पतींसाठीची पोषक द्रव्ये, त्यांचे रोग यावर प्रश्न विचारलेले आहेत. या घटकामध्ये बहुविधानी प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
वनस्पती आणि प्राण्यांच्या वर्ग, जाती, प्रजाती यांची वैशिष्टय़े तुलनात्मक तक्त्यांमध्ये नोट्स काढून अभ्यासणे व्यवहार्य ठरते.
वनस्पतींमध्ये पेशींची रचना, मुळे, खोड, पाने, फुले, फळे, परागीभवन यांमधील प्रकार, वैशिष्टय़े, या सर्वावर होणारा भौगोलिक वैशिष्टय़ांचा परिणाम या मुद्यांच्या आधारे अभ्यास करावा.
प्राण्यांमध्ये पेशींची रचना, शरीररचना, अवयव संस्था, अधिवास, अधिवासाप्रमाणे होणारे अनुकूलन (adaptation), या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.
वनसेवा परीक्षेसाठीची शैक्षणिक अर्हता पाहिल्यास विज्ञान शाखेतील विषय, अभियांत्रिकी आणि कृषी या क्षेत्रातील पदवी आणि अन्य विषयातील पदवी असल्यास किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा विज्ञान शाख़ेतून दिलेली असणे व पदवीमधील एक विषय गणित असणे आवश्यक आहे. त्यामुळे पेपर दोनची काठिण्य पातळी ही पदवीच्या दर्जाची आहे असे म्हटले असले तरी सामान्य विज्ञान या घटकासाठी ठउएफळ बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासल्यास या घटकाची समाधानकारक तयारी होऊ शकते.
बारावी अथवा पदवीपर्यंत केलेला अभ्यास हा पारंपरिक प्रश्नांची उत्तरे लिहिण्याच्या दृष्टिकोनातून केलेला असतो. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी नेमका मुद्दा माहित असणे आवश्यक असते. त्यादृष्टीने व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या स्पर्धा परीक्षांच्या पॅटर्नशी तोंडओळख करून देतात. मात्र पदवी मिळाल्यावर असा नेमका अभ्यास आणि उजळणी करण्याची सवय पुन्हा लावून घ्यायला हवी हे लक्षात घ्यावे.