महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील एकूण १,३३३ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ रविवार, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. (जाहिरात क्र. ४९/२०२४)

(१) उद्योग निरीक्षक गट-क (उद्योग ऊर्जा व कामगार विभाग) ३९ पदे.

government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न

(२) ‘कर सहायक’ गट-क वित्त विभाग – एकूण ४८२ पदे.

(३) तांत्रिक सहायक (वित्त विभाग – विमा संचालनालय) गट-क – एकूण ९ पदे.

(४) बेलिफ व लिपिक गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय विधी व न्याय विभाग – एकूण १७ पदे.

(५) लिपिक-टंकलेखक गट-क मंत्रालयाने प्रशासककीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – एकूण ७८६ पदे.

सर्व पदांमधून महिलांसाठी ३० पदे आणि ५ पदे खेळाडूंसाठी राखीव आहेत.

शैक्षणिक अर्हता पात्रता : (i) उद्योग निरीक्षक पदे वगळता इतर सर्व पदांसाठी पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

हेही वाचा : पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’ संस्थेत विविध पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या

उद्योग निरीक्षक पदांसाठी अभियांत्रिकीमधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगर रचना इ. विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

(पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत). मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्विकारण्यासाठी विहीत केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

उपरोक्त शैक्षणिक अर्हतेबाबत टंकलेखन अर्हता – कर सहायक पदासाठी – मराठी टंकलेखन – ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. बेलिफ व लिपिक/लिपिक टंकलेखक पदासाठी – मराठी टंकलेखन – ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन – ४० श.प्र.मि. अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. दिव्यांग/ माजी सैनिक/अनाथ यांना टंकलेखेन अर्हता अनिवार्य नाही. टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असतील.

केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षांत मराठी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे विहीत प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. तसेच केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱया उमेदवाराची लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षांत इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे विहीत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील अन्यथा वेतनवाढ रोखण्यात येईल. विहीत टंकलेखन अर्हता मुख्य परीक्षेकरिता अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Success Story Of Tathagat Avatar Tulsi : एकेकाळी चाइल्ड प्रॉडिजी म्हणून होती ओळख; पण आज आहेत… वाचा तथागत अवतार तुलसी यांची गोष्ट

वयोमर्यादा : सर्व पदांसाठी दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी अमागास – १९ ते ३८, मागासवर्गीय/आदुघ/अनाथ खेळाडू – १९४३, दिव्यांग – १९४५ वर्षे.

वेतनश्रेणी : (i) तांत्रिक सहायक पदासाठी साठी एस्-१० रु. २९,२००/- – ९२,३००/-; (ii) उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय – एस्-१३ रु. ३५,४००/- – १,१२,४००/-; (iii) कर सहायक – एस्-८ रु. २५,५००/- – ८१,१००/-; (iv) बेलिफ व लिपिक / लिपिक टंकलेखक – एस्-६ रु. १९,९००/- – ६३,२००/-. अधिक महागाई भत्ता व अधिक नियमांनुसार देय इतर भत्ते.

निवड पद्धती : परीक्षेचे टप्पे – (१) सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण, (२) मुख्य परीक्षा पद क्र. १ ते ५ साठी ४०० गुण, मुख्य परीक्षा संबंधित संवर्गाची/पदांची कर्तव्ये व जबाबदाऱया आणि अभ्यासक्रम लक्षात घेऊन स्वतंत्रपणे आयोजित केली जाईल.

कर सहायक, बेलिफ व लिपिक तसेच लिपिक टंकलेखक पदांसाठी विहीत टंकलेखक कौशल्य चाचणी अनिवार्य आहे. पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱया उमेदवारांनी संबंधित आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा आणि अधिवास प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.

महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱया उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) असल्याबाबत तसेच नॉन-क्रिमी लेयरमध्ये मोडत असल्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.

सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाईल. (सामान्य क्षमता चाचणी – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ १ तास, माध्यम मराठी व इंग्रजी – चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्य शास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धीमापन चाचणी व अंकगणित)

परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे https:// mpsconline. gov. in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईद्वारे परीक्षेपूर्वी ७ दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. संयुक्त पूर्व परीक्षेस पात्र असल्यास उमेदवार एक, दोन किंवा सर्व पदांसाठी विकल्प (ऑप्शन) देऊ शकतात. परीक्षा शुल्क : आमागास – रु. ३९४/-, मागासवर्गीय/आदुध/अनाथ – रु. २९४/-, माजी सैनिक – रु. ४४/-.

हेही वाचा : अंबानी, अदानी यांच्यापेक्षाही श्रीमंत व्यक्तीनं एकेकाळी केलं होतं वेटरचं काम; वाचा प्रसिद्ध कंपनीच्या सीईओचा प्रवास

परीक्षा शुल्क ऑनलाइन दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत भरणे, तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरिता विहीत अंतिम दि. ६ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत. अर्जाचे शुल्क ऑफलाइन एसबीआय चलान मार्फत दि. ७ नोव्हेंबर २०२४ बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत भरता येईल.

प्रस्तुत परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या https:// mpsc. gov. in या संकेतस्थळावरील उमेदवारांकरिता माहिती विभागातील परीक्षा अंतर्गत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https:// mpsconline. gov. in तसेच https:// mpsc. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अर्ज https:// mpsconline. gov. in या संकेतस्थळावर ४ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.