रोहिणी शहा

गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा पेपर दोन प्रत्येक पदासाठी स्वतंत्र असला तरी त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी हा घटक समान आहे. या आणि पदासाठी आवश्यक ज्ञान घटाकांचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल

१. सर्व पदांसाठी समान सामान्य क्षमता चाचणी

बुद्धिमत्ता चाचणी

महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/ भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी

महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, Migration of Population  व त्याचे Source आणि destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भूस्खलन आणि हिमस्खलनाची नेमकी कारणे कोणती? भारतातील कोणत्या भागात सर्वाधिक घटना घडतात?

* भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे – शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका (तिन्ही पदांसाठी)

* राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधी मंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. (केवळ ASO व  STI साठी)

२. प्रत्येक पदासाठी वेगळय़ाने विहीत अभ्यासक्रम

सहायक कक्ष अधिकारी

* राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार व कार्ये), केंद्र सरकार, केंद्रीय विधीमंडळ, राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ).

* जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन

* न्यायमंडळ न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्याय मंडळ – कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रीयता, जनहीत याचिका,

* नियोजन प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देश फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३वी व ७४वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेखा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : संसदेत किती प्रकारचे नेते असतात? त्यांची कार्ये कोणती?

राज्य कर निरीक्षक :

* नियोजन या उपघटकाचा अभ्यासक्रम सहायक कक्ष अधिकारी पदासाठीच्या नियोजन उपघटकानुसारच आहे.

* शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांचे महत्त्व आणि गरज, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ जसे ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनि:सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर इत्यादी), दळणवळण (पोस्ट, तार व दूरसंचार), रेडिओ, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ डी आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खासगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.

* आर्थिक सुधारणा व कायदे पार्श्वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT, WTO इत्यादीशी संबंधित कायदे व नियम

* आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व काल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंत:प्रवाह, रचना व वाढ, घाऊ क व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडीट रेटींग.

* सार्वजनिक वित्त व्यवस्था महसुलाचे साधन, टॉक्स, नॉन टॉक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील करसुधारणा, VAT सार्वजनिक ऋणवाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.

हेही वाचा >>> केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना ६० हजारांहून अधिक पगार मिळणार

पोलीस उपनिरीक्षक :

* मानवी हक्क व जबाबदाऱ्या संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी. (िहसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५; मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३; कौटुंबिक िहसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५; अनूसूचित जाती व अनूसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, १९८९, हुंडाबंदी अधिनियम, १९६१; महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान,

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१

भारतीय दंड संहिता, १८६०

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३

भारतीय पुरावा अधिनियम, १८७२

दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक:

* नोंदणी अधिनियम, १९०८

* महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१; नोंदणी फी तक्ता

* महाराष्ट्र दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम, २०१३

* महाराष्ट्र इ-रजिस्ट्रेशन आणि इ-फायिलग नियम, २०१३

* महाराष्ट्र मुद्रांक कायदा

* महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा इ भरणा व परतावा नियम, २०१३

* महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम, १९९५

* विशेष विवाह अधिनियम, १९५४ आणि विशेष विवाह नियम, १९६४

* मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२

Story img Loader