मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने काही जागांसाठीची नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प अभियंता सिव्हिल या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.mrvc.indianrailways.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC)भरती मंडळ, मुंबईने ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीत एकूण २० रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांना बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

पदाचे नाव – प्रकल्प अभियंता – सिव्हिल.

एकूण रिक्त पदे – २०

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
  • निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख – २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२३.

हेही वाचा- नवी मुंबईत नोकरीची संधी! भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

मुलाखतीचा पत्ता

व्यवस्थापक (HR), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-400020.

अधिकृत वेबसाईट – https://mrvc.indianrailways.gov.in/

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून ६० % पेक्षा जास्त गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवीधर.

भरती संबंधित आवश्यक आणि अधिकच्या माहितीसाठी (https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/PE%20Advertisement.pdf) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.