MSME Recruitment 2024: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत विकास आयुक्त कार्यालयाने (MSME) कराराच्या आधारावर ९३ जागांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तरुणांना यंग प्रोफेशनल पदावर काम करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळणार आहे

१ जानेवारी २०२४ पर्यंत३२ वर्षांच्या कमाल वयोमर्यादेसह यंग प्रोफेशनल पदासाठी ही भरती केली जाणार आहे . या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांनी ६०, ००० रुपये प्रति महिना रक्कम मोबादला म्हणून निश्चिक केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतातील MSME कार्यालयांसह विविध ठिकाणी तैनात केले जाईल.

सुरुवातीला कराराचा कालावधी दोन वर्षांसाठी आहे. उमेदवाराची कामहिरी आणि संस्थेच्या गरजेनुसार तीन वर्षांपर्यंत वाढवता येईल. उमेदवारांनी कोणत्याही मानविकी विषय/क्षेत्र किंवा BE/B.Tech मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून CS किंवा IT किंवा MCA मध्ये, संबंधित कामाच्या किमान एक वर्षाच्या अनुभवा असला पाहिजे. सॉफ्टवेअर गॅदरिंग प्रोसेसप्रक्रिया, प्रोग्रामिंग, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट इत्यादींचा अनुभव असणे इष्ट आहे.

हेही वाचा – SBI recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी! भरतीबद्दल माहिती पाहा

दोन्ही बाजूंनी एक महिन्याच्या नोटिस कालावधीसह, असमाधानकारक किंवा प्रामाणिकपणा आणि सचोटीचा अभाव आढळल्यास सेवा समाप्त करण्याचा अधिकार करारामध्ये राखीव आहे.

इच्छुक अर्जदारांनी वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत estt-hqrs@dcmsme.gov.in या ईमेलद्वारे त्यांचे तपशील सादर करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुक अर्जदारांनी वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत estt-hqrs@dcmsme.gov.in या ईमेलद्वारे त्यांचे तपशील सादर करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

हेही वाचा – हेही वाचा : CNP Nashik recruitment 2024 : नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी जागा उपलब्ध

अधिक माहिती आणि प्रवेशासाठी, येथे क्लिक करा: अधिकृत सूचना – https://msme.gov.in/sites/default/files/vacancies/vacancycircular150324.pdf

अर्जाच्या प्रोफॉर्मामध्ये नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख/वय, लिंग, शैक्षणिक पात्रता, अनुभवाचे तपशील आणि शेवटचे वेतन यासारख्या तपशीलांचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचा रेझ्युमे देखील जोडणे आवश्यक आहे.

ईमेल सबमिशनच्या सूचनांमध्ये ईमेलचा मुख्य भाग म्हणून प्रोफॉर्मा पाठवणे आणि सर्व संबंधित कागदपत्रे/प्रमाणपत्रे एकच PDF फाइल म्हणून संलग्न करणे समाविष्ट आहे, १० एमबीपेक्षा जास्त मोठी फाईल नसावी. रेझ्युमे २ एमबी पेक्षा जास्त मोठा नसावा आणि स्वतंत्र PDF फाईल म्हणून पाठवावा.