MSPHC Bharti 2023: महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांनी कार्यकारी अभियंता पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://msphc.org/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. MSPHC मुंबई (Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd Mumbai) भरती मंडळाने जुलै २०२३ च्या जाहिरातीत विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई भरती २०२३ –
पदाचे नाव – कार्यकारी अभियंता.
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक ८९-८९ए, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- ४०००३०.
हेही वाचा- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदांच्या ९३ जागांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – ५० वर्षांपर्यंत.
- आरक्षित – ५५ वर्षांपर्यंत.
अधिकृत वेबसाईट – https://www.msphc.org/
शैक्षणिक पात्रता –
- कार्यकारी अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
- शासकीय/निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांना कार्यकारी अभियंता पदाचा किमान ३ वर्षांचा किंवा उपअभियंता पदाचा १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २६ जुलै २०२३.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑगस्ट २०२३.
भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/12zxtM_Dp1NWejtU_Qm4D-3SxRIgel-Kk/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.