Mumbai Home Guard Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेत १० वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी आहे. बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहेत. महानगरपालिकेकडून २७७१ होम गार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी पास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह १० जानेवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मग आता या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमार्यादा काय असणार? हेच सविस्तरपणे जाणून घेऊ?

होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावा.

IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
Development permits under MMRDA now online
एमएमआरडीएच्या अखत्यारीतील विकास परवानग्या आता ऑनलाईन
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
Job Opportunity 234 Vacancies in HPCL career news
नोकरीची संधी: ‘एचपीसीएल’मध्ये २३४ रिक्त पदे
Animal Husbandry Commissionerate, Tagging ,
रखडलेली पशुगना ४२ टक्क्यांवर; जाणून घ्या आढावा बैठकीत सचिवांनी काय आदेश दिले

पदाचे नाव काय आहे?

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार होमगार्ड या पदासाठी सदर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

होमगार्डसाठी अर्ज करणार असाल तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे..

होमगार्डसाठी पात्रता काय?

उमेदवाराची उंची ही पुरुषांकरता १६२ सेमी महिलांकरता १५० सेमी गरजेची आहे. छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान ७६ सेमी गरजेची असते.

पदसंख्या किती असणार?

एकूण २७७१ पदांवर भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा

जाहिरातीनुसार २० ते ५० वर्ष वय देण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे

रहिवासी प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
जन्मतारखेचा पुरावा
शाळा सोडल्याचा दाखला
३ महिन्याच्या आतील पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र

हेही वाचा >> स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या ६०० पदांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेच्या आधी करा अर्ज

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम BMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. नंतर ऑनलाइन पद्धतीने सविस्तर माहिती भरून अर्ज करावा लागेल. अर्जाची अंतिम तारीख ही १० जानेवारी २०२५ असणार आहे.

होमगार्डचे नेमके काम काय असते?

देशात होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जाते. होमगार्ड ही नोकरी किंवा रोजगार नसून आपत्कालिन स्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या मागणीनुसार त्यांना बंदोबस्तासाठी बोलवले जाते. अग्निशमन, विमोचन, महामारीकाळात, संपकाळात प्रशासनाच्या मदतीसाठी होमगार्डची नियुक्ती करण्यात येते.

Story img Loader