Mumbai Customs Duty Jobs For 10th Pass: मुंबई कस्टम्स अंतर्गत ‘कर्मचारी कार चालक’ पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २० फेब्रुवारी २०२४ च्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर आपण अर्ज दाखल करणे आवश्यक असेल. या पदासाठी किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे व कामाचे ठिकाण हे मुंबईतच असेल. १८ ते २७ या वयोगटातील उमेदवारांना निवडीसाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे सुद्धा समजतेय. मुंबई कस्टम्सतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात याविषयी दिलेली सविस्तर माहिती व मूळ जाहिरात पाहूया..
पदाचे नाव: कर्मचारी कार चालक
पदसंख्या: २८ जागा
नोकरीचे ठिकाण – मुंबई<br>वयोमर्यादा: १८ – २७ वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२४
अधिकृत वेबसाईट – https://www.mumbaicustomszone1.gov.in/
पात्रता निकष
मूळ जाहिरातीनुसार, कर्मचारी कार चालक पदासाठी पात्रता निकष हे शैक्षणिक व अनुभव दोन्ही स्वरूपात आहेत. उमेदवाराचे किमान १० वीचे शिक्षण पूर्ण झालेले असावे तसेच त्याच्यांकडे मोटार कारसाठी अधिकृत वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. मोटार चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असायला हवा.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कर्मचारी कार चालक पदावर कायमस्वरूपी निवड होण्यापूर्वी किमान दोन वर्षांचा कालावधी प्रोबेशनवर (कंत्राटी) काम करावे लागेल. द्वितीय श्रेणीतील या पदासाठी पगार किमान १९,००० ते कमाल ६३,२०० पर्यंत असू शकतो.