Karagruh Police Bharti 2024: मुंबई कारागृह पोलिस विभाग अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या विभागात “पोलिस शिपाई” या पदासाठी काही रिक्त पदे आहेत. यामुळे या रिक्त पदांसाठी ही भरती मोहीम राबवण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार पोलिस विभागात काम करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी नोकरीची ही मोठी संधी असणार आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज mahaprisons.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पाठवायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Karagruh Police Bharti 2024: भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, पदे आणि पदसंख्या, वयोमर्यादा, अर्ज फी, निवड प्रक्रिया कशी होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पदाचे नाव आणि पदसंख्या – पोलिस शिपाई या पदाच्या ७१७ रिक्त जागांसाठी ही भरती मोहीम जाहीर केली आहे.

शैक्षणिक पात्रता – पोलिस शिपाई या पदासाठी १२ वी पास असणे महत्त्वाचे आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

वयोमर्यादा – खुला वर्ग – १८ ते २८ वर्षे, तर मागासवर्गीय १८ ते ३३ वर्षे.

अर्ज फी – खुला प्रवर्गासाठी ४५० रुपये, तर मागास वर्गासाठी ३५० रुपये अर्ज फी आहे.

निवड प्रक्रिया – पात्र उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी आदी पद्धतीने होईल.

ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म भरण्याची लिंक :

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

हेही वाचा…Maha RERA Bharti 2024 : ‘महारेरा’अंतर्गत ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची सविस्तर माहिती…

ऑनलाइन फॉर्म भरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

  • अर्जदारांना वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर देण्याची विनंती केली जाते, कारण त्यांचा वापर निवड प्रक्रियेच्या संवादासाठी केला जाईल.
  • पुढील भरती प्रक्रियेसाठी अर्जदाराने योग्य युजर आयडी/ईमेल आयडी आणि पासवर्ड जपून ठेवावा.
  • नोंदणी करताना अर्जदाराने दिलेल्या ईमेल आयडीवर पासवर्ड रिसेट करण्याची लिंक पाठवली जाते. त्यामुळे नोंदणी करताना चुकीचा/अवैध ईमेल आयडी टाकल्यास पासवर्ड पुनर्प्राप्त करता येणार नाही.
  • कृपया ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा, एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर बदल केले जाणार नाहीत.
  • तर अशा प्रकारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai karagruh police bharti 2024 recruitment notification published by police department for police constable asp