MMRCL Recuritment 2023 : मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छूक उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( MMRCL) मॅनेजरसह अन्य पदांवर भरतीसाठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यासाठी अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर सुरू केली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवार MMRCL च्या अधिकृत वेबासाईटवर (mmrcl.com)जाऊन अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया २१ जून २०२३ रोजी सुरू झाली असून १ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करू शकता. या भरती मोहिमेंतर्गत एकुण २२ पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.
पदाचा तपशील
- जनरल मॅनेजर: १ पद
- सि. डेप्युटी मॅनेजर : २पद
- डेप्युटी मॅनेजर: २ पद
- असिस्टंट मॅनेजर : ७ पद
- डेप्युटी इंजिनिअर: १ पद
- एनव्हायरमेंट सायंटिस्ट: १ पद
- सुपरवायझर (ऑपरेशन सेफ्टी): १ पद
- सुपरवायझर (मेटेरिअल मॅनेजमेंट): १ पद
- जुनिअर इंजीनियर-II (ट्रॅक): ४ पद
- प्रोजेक्ट असिस्टेंट (फायनान्स): २ पद
हेही वाचा – Govt jobs 2023 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेडमध्ये १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, १८४ जागांची होणार भरती
उमेदवाराने या भरतीकरिता अर्ज करण्याआधी अधिसुचना व्यवस्थित वाचावी.
अधिसुचना – https://mmrcl.com/sites/default/files/Advt.%202023-01-%20Website%20Copy%20Rev.pdf
MMRCL Recuritment 2023 : निवड प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना संबधित क्षेत्रामध्ये त्यांची पात्रता/ अनुभवाच्या आधारावर मुलाखतीसाठी निवडले केले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार एमएमआरसीएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.