Mumbai Port Trust Bharti 2023: मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) च्या मुंबई बंदर प्राधिकरणाने व्यवस्थापक (कायदेशीर) पदांसाठी पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.mumbaiport.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) भरती मंडळ, मुंबई यांनी मार्च २०२३ च्या जाहिरातीत एकूण १२ रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यानुसार ही पदे भरली जाणार आहेत.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी http://mumbaiport.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्यावी.

Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश
BSNL unveils 365 day plan
वर्क फ्रॉम होम करताय? तुमच्यासाठी BSNL चा ‘हा’ रिचार्ज ठरेल बेस्ट? किंमत किती ? जाणून घ्या
Free education girls, fee, Free education
मुलींना शिक्षण मोफत, तरीही शुल्क वसूलल्यास आता थेट कारवाई
Online facility available for transfer in slum redevelopment Mumbai
झोपु घरांचे स्थलांतर आता सोपे! ॲानलाईन सुविधा उपलब्ध
Mumbai, MHADA 2030 House Allotment Applications, application process, technical difficulties, online workshop, house lottery
म्हाडाची सोडतपूर्व प्रक्रिया समजून घेण्याची संधी, माहितीसाठी उद्या ऑनलाइन कार्यशाळा

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ –

पदाचे नाव – व्यवस्थापक (कायदेशीर).

एकूण रिक्त पदे – १२

हेही वाचा- महिलांना पोलिस खात्यात नोकरीची संधी! १,४२० लेडी कॉन्स्टेबल पदांसाठी होणार भरती, इतका पगार मिळणार

वयोमर्यादा – ३५ वर्षांपर्यंत.

प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष तर OBC साठी ३ वर्षांपर्यतची सूट देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

मासिक पगार – ६५ हजार रुपये.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.

शैक्षणिक पात्रता – एलएलबी पदवी ( LLB Degree)

अनुभव –

वकील म्हणून लॉ फर्ममध्ये किंवा कोणत्याही PSU/सरकारी आणि व्यावसायिक संस्थेमध्ये कायदा अधिकारी/कार्यकारी म्हणून काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असावा.

हेही वाचा- भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या २२७ जागांसाठी भरती जाहीर, आजच करा अर्ज

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २६ एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता: सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्टल हाउस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी https://mumbaiport.gov.in/writereaddata/linkimages/1980210286.pdf या लिंकवर क्लिक करा.