Mumbai Port Trust Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे वरिष्ठ उपसचिव पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ –

पदाचे नाव – वरिष्ठ उपसचिव

एकूण पदसंख्या – ३

शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात पदवी (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>

हेही वाचा- पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

वयोमर्यादा – ४२ वर्षे

अर्जाती पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट भवन, जीआर फ्लोअर, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.mumbaiport.gov.in

पगार –

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना १६ हजार ते २० हजार ८०० रुपयांपर्यंत पगार मिळणार.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/124zjHswbYlXPfP-FhU06FLr2oosfsH4-/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai port trust recruitment for senior deputy secretary post salary more than 20 thousand know how to apply jap
Show comments