Mumbai University Recruitment 2024: मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) प्राध्यापक पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट muappointment.mu.ac.in वर ऑनलाइन अर्ज पाठवू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १५२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत ; ज्यामध्ये विद्याशाखेच्या अधिष्ठाता पद, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल आदी पदांचा समावेश आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. तर या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, अर्ज कसा करायचा, कुठे पाठवायचा, अर्ज फी याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

Mumbai University Recruitment 2024: रिक्त पदे व पदसंख्या

Zilla Parishad school Viral Video
“इथे शिक्षणावर प्रेम केलं जातं…” जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नाचत नाचत गायलं पावसाचं गाणं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Mumbai University Ban on student agitation
मुंबई विद्यापीठ परिसरात पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी, विद्यार्थी संघटनांकडून निषेध, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
ratnagiri government medical college
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राज्यात प्रथम
Amravati University, Gender Audit,
अमरावती विद्यापीठात मुलींची संख्‍या अधिक; काय आहे ‘जेंडर ऑडिट’मध्ये ?
mumbai university senate elections is finally taking place today
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : मतदान सुरू; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
How to prepare for JEE Main 2025
JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
Faculty Recruitment Newly Advertised Recruitment for 111 seats in two months
प्राध्यापक भरती नव्याने जाहिरात; १११ जागांवर दोन महिन्यांत भरती?

विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी – ४ जागा.
प्राध्यापक : २१ पदे.
सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल : ५४ पदे
सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल : ७३ पदे

Mumbai University Recruitment 2024: अर्ज कुठे पाठवायचा?

उमेदवारांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे तीन संच रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक २५, फोर्ट, मुंबई-४००३२ येथे पाठवायचे आहेत. उमेदवाराने अर्जाच्या सर्व संचासह त्याचा/तिचा बायोडेटा सबमिट करावा.

हेही वाचा…IAF Agniveer Recruitment 2024: १२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! भारतीय हवाई दलात भरती सुरू; पाहा कसा करायचा अर्ज

जाहिरात क्रमांक क्र. एएक्युए/आयसीडी/२०२३-२४/८५३, दिनांक २२ सप्टेंबर २०२३ नुसार सदर पदांकरिता ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत, अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Mumbai University Recruitment 2024: अर्ज फी –

उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादींच्या स्व-प्रमाणित कागदपत्र व अर्ज शुल्कासह अर्ज करायचा आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ५०० रुपये, तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी २५० रुपये अर्ज फी ऑनलाइन भरायची आहे. तसेच उमेदवाराने ही बाब लक्षात ठेवावी की, एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहिती प्रत्येक उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

अधिसूचना – https://muappointment.mu.ac.in/Advt%20%2008.07.2024%20with%20API%20Proforma.pdf

उमेदवार या लिंकद्वारे थेट अर्ज करू शकतात.

लिंक – https://muappointment.mu.ac.in/