Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत विविध ‘इंजिनियर’ पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रात, पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा याबद्दल माहिती जाणून घ्यावी. तसेच, या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे हेदेखील नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाणून घ्यावे.

Mumbai University recruitment 2024 : पद आणि पदसंख्य

कनिष्ठ अभियंता [Junior Engineer – Civil] या पदासाठी एकूण ६ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
कनिष्ठ अभियंता [Junior Engineer – Electrical] या पदासाठी एकूण २ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

BARC Mumbai Recruitment 2024
BARC Mumbai Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
mumbai university, Idol admission, students, 31st July
‘आयडॉल’चे प्रवेश आजपासून, विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत
The Bhabha Atomic Research Centre Mumbai Recruitment For fifty vacant posts of Driver Read The Notification & apply
BARC Mumbai Recruitment 2024 : मुंबईत नोकरी शोधताय? भाभा अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती सुरू; आजच करा अर्ज
School Student Funny Marathi Love Letter Viral
PHOTO: “प्रिय आकाश तु मला प्रपोज केलं” शाळेतल्या मुलांचं ‘लव्ह लेटर’ व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल
COEP Pune recruitment 2024
COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

अशा एकूण ८ रिक्त पदांवर मुंबई विद्यापीठाअंतर्गत उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

Mumbai University recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

  • कनिष्ठ अभियंता [Junior Engineer – Civil] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनियनरींगमधील किमान ३ वर्षांची पदवी अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनियरिंग क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.
  • तसेच, संबंधित क्षेत्रातील किमान १ वर्ष कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
  • कनिष्ठ अभियंता [Jr. Engineer – Electrical] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल इंजिनियनरींगमधील किमान ३ वर्षांची पदवी अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.
  • तसेच, संबंधित क्षेत्रातील किमान १ वर्ष कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

हेही वाचा : IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये नोकरीची संधी

Mumbai University recruitment 2024 : वेतन

कनिष्ठ अभियंता [Junior Engineer – Civil] या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,०००/- रुपये देण्यात येणार आहे.
कनिष्ठ अभियंता [Jr. Engineer – Electrical] या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,०००/- रुपये देण्यात येणार आहे.

Mumbai University recruitment 2024 – मुंबई विद्यापीठ अधिकृत वेबसाईट –
https://mu.ac.in/

Mumbai University recruitment 2024 – अधिसूचना –
https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/06/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-2024-1.pdf

Mumbai University recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज ऑफलाईन / मुलाखतीद्वारे करायचा आहे.
या नोकरीसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ ठेवण्यात आले आहेत.
मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी नोकरीचा अर्ज सोबत ठेवावा.
नोकरीच्या अर्जामध्ये आपली संपूर्ण आणि अचूक माहिती उमेदवारांनी भरावी.
तसेच, अर्जासह आपली आवश्यक कागदपत्रे बरोबर न्यावी.
नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांनी, दिलेल्या वेळेच्या किमान अर्धातास आधी उपस्थित राहावे.
वरील नोकरीच्या मुलाखती ८ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत.
मुलाखतीची वेळ ही सकाळी १० वाजता [१०:०० am] ठेवण्यात आली आहे.
मुलाखत स्थळ : मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व] मुंबई,९८
उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत हजर राहणे अनिवार्य आहे. उशिरा आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.