Nagpur Municipal Corporation Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत २४५ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने भरती जाहीर केली आहे. नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या संदर्भातील जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून, इच्छुक उमेदवारांना १५ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिका लवकरच २४५ रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवणार आहे. भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर नव्या उमेदवारांची नियुक्ती होणार आहे. सध्या, दर महिन्याला २० ते ३० कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या भरतीमुळे कर्मचारी ताण कमी होईल आणि पालिकेचे काम अधिक वेगाने पार पडेल.
रिक्त पदे –
भरती प्रक्रियेअंतर्गत खालील पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे:
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): ३६ पदे
कनिष्ठ अभियंता (विद्युत): ३ पदे
नर्स परिचारिका (जी. एन. एम.): ५२ पदे
वृक्ष अधिकारी: ४ पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकः १५० पदे
वेतन
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ३८,६०० ते १,२२,८००
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – ३८,६०० ते १,२२,८००
नर्स परिचारिका (जी. एन. एम.): ३५,४०० ते १,१२,४००
वृक्ष अधिकारी – ३५,४०० ते १,१२,४००
स्थापत्य अभियंता सहाय्यक – २५ ,५०० ते ८१,१००
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
ओळखपत्र
अर्जाचा शुल्क भरल्याची पावती
हेही वाचा >> दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस दलात भरती, जाणून घ्या कुठे कसा कराल अर्ज
महत्त्वाची माहिती
ऑनलाईन अॅप्लिकेशन अधिकृत वेबसाइट https://nmcnagpur.gov.in वर उपलब्ध करून दिले जातील.
वरील पदाच्या भरतीसाठी, खाली नमूद केल्याप्रमाणे, पोस्टनिहाय परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (संगणक आधारित चाचणी) विहित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेतली जाईल.
परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक असल्यास, परीक्षा एका दिवसापेक्षा जास्त दिवस आणि एकापेक्षा जास्त सत्रात घेतली जाईल.
संबंधित उमेदवाराला त्याची परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राचा तपशील वरील वेबसाइटप्रमाणे ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्राद्वारे मिळेल.
या वेळापत्रकात काही बदल झाल्यास, सुधारित वेळापत्रक नागपूर महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच जाहीर केले जाईल.
परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि त्यानंतरची निवड प्रक्रिया नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
उमेदवारांना वर नमूद केलेल्या पद्धतीशिवाय इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या सूचित केले जाणार नाही कारण सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वरील वेबसाइटला नियमितपणे भेट दिली पाहिजे.