Nagpur Mahanagarpalika bharti 2024 : महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले जातात. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील महानगरपालिका अंतर्गत दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेत काम करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही मुलाखत कोणत्या पदांसाठी आहे, शैक्षणिक पात्रता, मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.
प्रत्येकाचे स्वप्न असते की महानगरपालिकेत काम करावे. अशा इच्छुक लोकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. खालील सविस्तर माहिती जाणून तुम्ही या संधीचे सोने करू शकता.
ही मुलाखत खालील दोन पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
१. कंत्राटी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता – १
२. कंत्राटी सेवानिवृत्त उपअभियंता – १
इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार वरील पदांसाठी मुलाखतीस हजर राहावे.
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार सार्वजानिक बांधमाक विभाग अथवा पाटबंधारे विभाग व तत्सम शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले असावे. त्यांना याविषयी अनुभव असावा. याशिवाय ते मेकॅनिकल आणि ऑटोमोबाइल इंजिनिअर Mechanical / Automobile Engineer) असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ६५ वर्षे असावे.
निवड प्रक्रिया – निवड प्रक्रिया अतिशय साधी आणि सोपी आहे. मुलाखतीद्वारे पात्र उमेदवार वरील पदांसाठी निवडला जाईल.
मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी २२ फेब्रुवारी २०२४ ला खालील पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे
अधिकृत वेबसाइट – सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
मुलाखतीचे ठिकाण – अतिरिक्त आयुक्त (सामान्य), सिव्हील लाईन, मनपा नागपूर या पत्त्यावर उमेदवारांनी दिलेल्या तारखेवर हजर राहावे.
वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल. २२ फेब्रुवारीला वरील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. आपल्या बरोबर आवश्यक कागदपत्रे आणावी. मुलाखतीला येण्यापूर्वी https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर आणि https://shorturl.at/fgzE7 या PDF जाहिरातीवर क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्यावी.