विवेक वेलणकर
ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर विषयात करीअर करायचे आहे अशा फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स विषय घेऊन अकरावीची किंवा बारावीची परीक्षा देणाऱ्या किंवा मॅथेमॅटिक्स विषय घेऊन दहावीनंतरचा तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाटा नावाची एक सीईटी द्यावी लागते. कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही स्वायत्त संस्था ही परीक्षा घेते. ही परीक्षा ६ एप्रिल पासून जुलै अखेरपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी सकाळी १० ते १ आणि दुपारी १.३० ते ४.३० अशा दोन सेशन्समध्ये घेतली जाईल. विद्यार्थी जास्तीत जास्त तीन वेळा या परीक्षेला बसू शकेल आणि या तीनपैकी ज्या परीक्षेत त्याला जास्तीत जास्त मार्क आहेत ते मार्क आर्किटेक्चर प्रवेशासाठी गृहीत धरले जातील. या नाटा परीक्षेत मिळालेल्या मार्कांवर दोन वर्षांपर्यंत प्रवेश मिळतो म्हणूनच यंदा अकरावीची परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा अहमदनगर, अकोला, अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, कल्याण, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि सोलापूर या शहरांमध्ये घेतली जाईल. परीक्षा इंग्रजी व मराठी दोन्हीपैकी कोणत्याही भाषेत देता येईल.
हेही वाचा >>> माझी स्पर्धा परीक्षा : समाज म्हणून यशाच्या व्याख्या बदलायला हव्यात
परीक्षेचे स्वरूप: परीक्षेचे दोन भाग असतात प्रत्येक भाग दीड तासांचा असतो. पहिला भाग पेपर पेन्सिल माध्यमाचा असून तो ८० मार्कांचा असतो. यात मुख्यत्वे ड्रॉईंग आणि कॉम्पोझिशन यावर प्रश्न असतात. दुसरा भाग १२० मार्कांचा असून तो कॉम्प्युटर बेस्ड असतो. यामध्ये दोन सेक्शन असतात , त्यातील पहिल्या सेक्शन मध्ये प्रत्येकी दोन मार्कांचे तीस प्रश्न असतात तर दुसऱ्या सेक्शनमध्ये प्रत्येकी चार मार्कांचे पंधरा प्रश्न असतात. या दोन्ही सेक्शनमध्ये रीझनिंग, सामान्य ज्ञान, डिझायनिंग थिंकिंग व सेन्सिटिव्हीटी व इंग्रजी यावर प्रश्न असतात. परीक्षेच्या पहिल्या भागात किमान २० गुण तर दुसऱ्या भागात किमान तीस गुण मिळणे आवश्यक आहे. दोन्ही भागांत मिळून दोनशे पैकी किमान ७० गुण मिळाले तरच विद्यार्थी आर्किटेक्चर प्रवेशासाठी पात्र होतो. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे आणि विद्यार्थी http://www.nata.in या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. आर्किटेक्चर हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून ज्या विद्यार्थ्यांकडे उत्तम निरीक्षण शक्ती, शास्त्रीय दृष्टिकोन , उच्च दर्जाची त्रिमिती आकलनशक्ती व सर्जनशीलता आहे ते विद्यार्थी या क्षेत्रात उज्ज्वल करिअर करू शकतात. आर्किटेक्चर डिग्री मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय, सरकारी/ निमसरकारी नोकरी याबरोबरच इंटिरिअर डिझायनिंग, लॅण्डस्केप डिझायनिंग, टाऊन प्लॅनिंग, साईट मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, व्हॅल्युएशन अशा विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.