NABARD Recruitment 2024: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agriculture and Rural Development) नाबार्डने भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड ए) पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार नाबार्डच्या (NABARD) अधिकृत वेबसाइट nabard.org वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, निवड कशी होईल याबद्दल सविस्तर घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

NABARD Recruitment 2024: रिक्त पदे व पदसंख्या

या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) पदांसाठी १०२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
1. सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) आरडीबीएस (RDBS): १०० जागा.
2. एम (राजसभा): २ जागा.

NABARD Recruitment 2024: महत्वाच्या तारखा

भरती प्रक्रिया २७ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परीक्षा १ सप्टेंबर २०२४ रोजी होईल.

हेही वाचा…RBI Recruitment 2024: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; जाणून घ्या कसा आणि कुठे करता येईल अर्ज

NABARD Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत तपासून घ्यावी.

अधिसूचना लिंक : https://www.nabard.org/auth/writereaddata/CareerNotices/2707240233final-advertisement-grade-a-rdbs-rajbhasha-2024.pdf

NABARD Recruitment 2024: वयोमर्यदा

अर्ज करणारा उमेदवार १ जुलै, २०२४ रोजी पर्यंत २१ ते ३० वर्षे वयोगटातील असावा.

NABARD Recruitment 2024: निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये चार टप्प्यांचा समावेश असेल. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी आणि मुलाखत. प्राथमिक परीक्षेत २०० प्रश्नांना आणि २०० गुण असतील. परीक्षेचा कालावधी १२० मिनिटांचा असेल. मुख्य परीक्षा २०० गुणांची असेल आणि कालावधी २१० मिनिटे असेल. सायकोमेट्रिक चाचणी एमसीक्यू आधारित असेल आणि कालावधी ९० मिनिटे असेल आणि शेवटी मुलाखत ५० गुणांची असेल.

NABARD Recruitment 2024: अर्ज फी

एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारासाठी अर्ज शुल्क १५० रुपये आहे आणि इतर सर्वांसाठी ७०० रुपये प्लस १५० रुपये म्हणजेच एकूण ८५० रुपये भरावे अर्ज फी असणार आहेत. तसेच अर्ज फी ऑनलाइन भरायची आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National bank for agriculture and rural development nabard has invited applications for 102 assistant manager posts apply now asp