विवेक वेलणकर
सध्या देशभरातील सरकारी अथवा खासगी शैक्षणिक संस्थामधील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा टप्पा हा पार करावाच लागतो. प्रत्येक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांची पात्रता, अभ्यास, तारखा या वेगवेगळ्या असतात. त्याबद्दलची माहिती या सदरात दर पंधरा दिवसांनी…
आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, होम सायन्स सह विविध शाखांमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांना मास्टर्स डिग्री साठी प्रवेश घ्यायचा असतो. देशातील शेकडो विद्यापीठ व संस्थांमध्ये मास्टर्स डिग्रीचे कोर्सेस उपलब्ध आहेत, मात्र या प्रत्येक विद्यापीठात वा संस्थेत यासाठी अर्ज करणे, त्यांच्या प्रवेश परीक्षा देणे हे विद्यार्थ्यांना जिकिरीचे होते. यावर उपाय म्हणून देशातील बहुसंख्य विद्यापीठ / संस्थांमध्ये मास्टर्स डिग्री प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे एक राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि यातील स्कोअर च्या आधारावर देशभरातील १३३ विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे तसेच संस्थांमध्ये मास्टर्स डिग्री साठी प्रवेश मिळतो.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान नेमके काय? या अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या इतर उपयोजना कोणत्या?
अगदी ग्रामीण भागासह देशातील सर्व विद्यार्थ्यांना एका पातळीवर येऊन एकाच परीक्षेतून स्वत: ला सिद्ध करत देशातील विविध विद्यापीठे/ संस्थांमध्ये प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशाने ही राष्ट्रीय स्तरावरील सीईटी सुरू करण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा ११ मार्च ते २८ मार्च या दरम्यान देशभरातील ३२४ केंद्रांवर घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक , कोल्हापूर, रत्नागिरी सह ४१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. पावणेदोन तासांच्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित ७५ प्रश्न सोडवावे लागतात. विद्यार्थ्यांना एका पेक्षा अधिक विषयांची परीक्षा देण्याचीही मुभा आहे. विद्यार्थ्यांच्या विषयाच्या ज्ञानाची कसोटी या परीक्षेत लागते. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असून त्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार मार्क दिले जातात तर चुकीच्या उत्तरासाठी एक मार्क वजा केला जातो. या परीक्षेसाठी अर्ज https://pgcuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने २४ जानेवारी २०२४ पर्यंत करता येतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ७ मार्च २०२४ ला अॅडमिट कार्ड मिळेल. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सारख्या मूलभूत शास्त्रीय विषयापासून डाटा सायन्स अॅग्रिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, होम सायन्स, लायब्ररी सायन्स, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, फोरेन्सिक सायन्स सारख्या विषयांपर्यंत आणि इंग्रजी, हिंदी आदि भाषांपासून सोशॉलॉजी, पॉलिटिक्स, कॉमर्स, एम बी ए,सोशल वर्क, मास कम्युनिकेशनपर्यंत विविध विषयांमध्ये देशभरातील अनेक विद्यापीठे/ संस्थांमध्ये मास्टर्स डिग्री प्रवेशासाठी ही उत्तम संधी आहे.