NFDC Recruitment 2023: नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुंबई विभागामध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे. या भरतीअंतर्गत तब्बल ४७ जागांवर नव्या उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. एनएफडीसीमध्ये काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. १ मे २०२३ ही अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख आहे. या संबंधित माहिती मिळवण्यासाठी एनएफडीसीच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेता येईल.

कोणकोणत्या जागांसाठी भरती होणार आहे?

एनएफडीसीमध्ये एकूण ४७ जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये विभाग प्रमुख, फिल्म प्रोग्रामर, माहिती तंत्रज्ञान प्रमुख, व्यवस्थापक, कलात्मक संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रोग्रामिंग प्रमुख, प्रमुख – (गॅलास, आणि रेड कार्पेट), ग्रेडिंग पर्यवेक्षक, पर्यवेक्षक, संरक्षक पर्यवेक्षक , असिस्टंट फिल्म प्रोग्रामिंग, समन्वयक, महोत्सव समन्वयक, सहयोगी समन्वयक, व्हिडिओ तंत्रज्ञ, कॅटलॉगिंग तज्ञ, पर्यवेक्षक/प्रोजेक्टिशियन, कार्यकारी, DCP क्रिएटर/LTO चेकर, ग्राफिक डिझायनर, प्रशासक. सहाय्यक/रत्न तज्ञ, कार्यालय सहाय्यक, हिंदी सहाय्यक, सामग्री लेखक, प्रक्षेपण सहाय्यक, चित्रपट तपासक/वॉल्ट व्यवस्थापन, चित्रपट परीक्षक सहाय्यक, संग्रहालय संशोधक आणि शिक्षक, अटेंडंट, शिक्षक/वक्ते, कार्यालय सहाय्यक अशा जागांचा समावेश असणार आहे.

Contractors are going to be charged twice as much for the deteriorated road repair work in Pimpri
पिंपरीतील रस्तेदुरुस्तीची निकृष्ट कामे; ठेकेदारांवर…!
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
panvel municipal corporation,
हरकतींसाठी महिन्याची मुदत द्या, पनवेल प्रारूप आराखड्याबाबत शेकापची महापालिकेकडे मागणी
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?
Cisf Recruitment 2024 Vacancy At Central Industrial Security Force For Constable Fireman
CISF Recruitment: ‘सीआयएसएफ’मध्ये नोकरी करण्याची थेट संधी; १ हजार १३० पदांसाठी भरती, दर महिना मिळणार ६५ हजार पगार
Tata Curvv Ev Waiting Periods Extended From 14 Days To 56 Days After Launch Tata Curvv EV
Tata Curvv EV: ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुटून पडले ग्राहक; लाँचिंगनंतर वेटिंग पीरियड पोहचला चक्क ५६ दिवसांवर
Vasai, school children safety, school van checking in vasai, Badlapur sexual abuse case, transport department, school buses, safety measures, regional transport campaign
शालेय बसेसची परिवहन विभागाकडून तपासणी सुरू, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई

आणखी वाचा – मुंबईमध्ये सरकारी नोकरीसाठी भरती जाहीर; MIDC अंतर्गत रिक्त पदांसाठी कसा कराल अर्ज

एनएफडीसीच्या मेगा भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावे लागणार आहेत. हे अर्ज त्यांना “महाव्यवस्थापक (P&A), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, 6 वा मजला, नेहरू सेंटर, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८” या पत्त्यावर पाठवावे लागतील. या संस्थेच्या http://www.nfdcindia.com या अधिकृत वेबसाइटवर भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता व अन्य निकषांसंदर्भातील माहिती उपलब्ध आहे. त्याशिवाय विविध जागांसाठी मिळणाऱ्या वेतनाबाबतची माहितीही तेथे नमूद करण्यात आली आहे. अर्ज केल्यानंतर लेखी परीक्षा किंवा मुलाखती यांद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.