भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, NHAI ने उपव्यवस्थापक (तांत्रिक) रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पण, उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार NHAI च्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ६० पदे भरण्यात येणार आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि रिक्त पदे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

NHAI Deputy Manager Recruitment 2024: पात्रता आणि निकष

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इंजिनिअरिंग पदवी घेतलेली असावी.
यूपीएससी (UPSC) द्वारे आयोजित इंजिनिअरिंग सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल) दिलेल्या असाव्या.
२०२३ मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी दिलेली असावी.
जाहिरातीच्या शेवटच्या तारखेनुसार वयोमर्यादा ३० वर्षांपेक्षा कमी असावी.

हेही वाचा…NLC इंडियामध्ये ६००पेक्षा जास्त पदांची होणार भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या…

NHAI Deputy Manager Recruitment 2024: निवड प्रक्रिया

२०२३ मधील यूपीएससीद्वारे आयोजित अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षेच्या (सिव्हिल) अंतिम गुणवत्तेच्या आधारावर उमदेवारांची निवड करण्यात येईल. (लिखित चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी)

महत्त्वाची माहिती:

सर्व निवडलेल्या उमेदवारांना पदावर रुजू होताना किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची सेवा देण्यासाठी पाच लाख रकमेचा सेवा बाँड लागू करण्यात येईल. या बाँडमध्ये NHAI मध्ये रुजू झाल्याची तारीख नमूद करण्यात येईल. तसेच संबंधित तपशिलांसाठी उमेदवार NHAI ची अधिकृत वेबसाइटदेखील पाहू शकतात.