राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेकडून यंग फेलो पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती भरती २०२३ बाबतची अधिक माहिती पुढीलप्रमाणे.
राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०२३ आहे. ही भरती एकूण १४१ रिक्त पदासांठी केली जाणार आहे. या भरतीची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेने जाहिरात क्रमांक 13/2023 मध्ये दिली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती भरती २०२३ –
पदाचे नाव – यंग फेलो
एकूण रिक्त पदे – १४१
शैक्षणिक पात्रता –
सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/ PG डिप्लोमा + MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते ३५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग ओबीसी/ EWS – ३०० रुपये.
मागासवर्गीय/ PWD – कोणतेही अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण – संपुर्ण भारत
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २८ एप्रिल २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ८ मे २०२३
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1n51YLFWAgp4gb_074b7nAdkIrHfTZB6p/view) या लिंकला अवश्य भेट द्या.
भरतीबाबतच्या अधिक माहितीसाठी http://www.nirdpr.org.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.