NEET UG Result 2024: यूजी NET परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने आज ४ जून २०२४ रोजीरोजी नीट यूजी-२०२४ (NEET UG 2024) चा निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) यूजी-२०२४ परीक्षेला बसले होते ते एनटीए NEET च्या अधिकृत वेबसाइट exams.nta.ac वर गुणपत्रिका तपासू शकतात. तसेच नीट यूजी-२०२४ चे निकाल neet.ntaonline.in वर देखील तपासले जाऊ शकतात. निकाल कसा पाहायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुण तपासण्यासाठी, उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल ; जे उमेदवार प्रवेश परीक्षेला बसले आहेत ते गुणपत्रिका तपासू शकतात आणि खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात.

नीट यूजी-२०२४ (NEET UG 2024) निकाल तपासण्याचा हा सोपा मार्ग –

१. NEET च्या अधिकृत exams.nta.ac.in/ या वेबसाइटला भेट द्या.

२. होम पेजवर उपलब्ध असलेल्या नीट यूजी निकाल २०२४ ‘NEET UG Result 2024’ लिंकवर क्लिक करा.

३. लॉगिन डिटेल्स टाईप करा आणि सबमिट वर क्लिक करा.

४. तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

५. निकाल व्यस्थित तपासा आणि डाउनलोड करा.

६. तसेच त्याची एक हार्ड कॉपी सुद्धा काढून ठेवा .

यावर्षी नीट यूजी-२०२४ प्रवेश परीक्षा ५ मे २०२४ रोजी देशभरात आणि परदेशात सुद्धा घेण्यात आली. परीक्षा एकाच शिफ्टमध्ये- दुपारी २ ते ५:२० या वेळेत घेण्यात आली. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) यूजी-२०२४ ही भारताबाहेरील १४ शहरांसह देशभरातील ५५७ शहरांमधील विविध केंद्रांवर २४ लाखांहून अधिक उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आली होती. तसेच अधिक संबंधित माहितीसाठो उमेदवार नीट यूजी-२०२४ ची अधिकृत वेबसाइट सुद्धा पाहू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National testing agency announced neet ug 2024 result declared the steps to download the scorecard is given here asp