NTPC Recruitment 2024 :नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC ने E4 स्तरावर प्रकल्प उभारणी / बांधकाम क्षेत्रात उपव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविले आहेत. अर्जाची प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ८ मार्च आहे. इच्छुक उमेदवार careers.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

NTPC Recruitment 2024 : या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा आणि रिक्त पदे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

१. रिक्त जागा आणि पदे- ११० रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.

डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल इरेक्शन)- २० पदे
उपव्यवस्थापक (मेकॅनिकल इरेक्शन)- ५० पदे
डेप्युटी मॅनेजर (सी ॲण्ड आय इरेक्शन)- १० पदे
डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल कन्स्ट्रक्शन)- ३० पदे

२. वयोमर्यादा- अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षे असावे.

३. अर्ज शुल्क- सामान्य / ईडब्ल्यूएस (EWS) / ओबीसी श्रेणीतील उमेदवारांनी ३०० रुपयांचे विनापरतीचे अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी (PWBD) / एक्सएसएम (XSM) श्रेणी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही.

हेही वाचा…BMC Bharti 2024: पदवीधरांना नोकरीची संधी; BMC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

४. अर्ज कसा करावा?

  • http://www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर करिअर टॅबवर क्लिक करा.
  • पुढे (E4 स्तर) येथे प्रकल्प उभारणी / बांधकाम क्षेत्रात डेप्युटी मॅनेजर म्हणून अनुभवी व्यावसायिकांची भरती या अर्ज लिंकवर क्लिक करा.
  • (Advt. क्र. ०५/२४. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च आहे. )
  • त्यानंतर उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे येथे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • फॉर्म सबमिट करा.
  • संदर्भासाठी फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्या. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National thermal power corporation bharti 2024 for 110 deputy manager posts till march 8 candidates apply online asp