संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत असणाऱ्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल येथे लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवरांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरु शकतात. भरतीसाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्त्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती २०२३ –
एकूण जागा – २८१
पदाचे नाव –
फिटर, मेसन (BC), I&CTSM, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फाउंड्रीमन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, MMTM, मशीनिस्ट, पेंटर (G), पॅटर्न मेकर, मेकॅनिक Reff. AC, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, शिपराईट (वुड), टेलर (G), वेल्डर (G & E), रिगर शिपराईट (स्टील), फोर्जर आणि हीट ट्रीटर,शिपराईट (स्टील)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
रिगर पदांसाठी – उमेदवार आठवी पास असणं आवश्यक आहे.
फोर्जर आणि हीट ट्रीटर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे १० वी पास असणं आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे ५० टक्के गुणांसह १० पास आणि ६५ टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असणं आवश्यक आहे. तसेच प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यसाठी भरतीची जाहीरात अवश्य पाहा.
वयोमर्यादा –
किमान वयोमर्यादा १४ वर्ष तर कमाल वयोमर्यादा २१ वर्षे अशी आहे.
उमेदवार हा २१ नोव्हेंबर २००२ ते – २१ नोव्हेंबर २००९ दरम्यान जन्मलेला असावा.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – ४ जून २०२३
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३
निवड प्रक्रिया –
- लेखी चाचणी
- मुलाखत/कौशल्य चाचणी
- मेरिट
भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1BADGbKcuvaXQ5ZGrP_wMBKLbo3blxCxW/view या लिंकवरील PDF अवश्य पाहा.